NEET PG 2022 : न्यायालय म्हणे, ‘सौ बात की एक बात’ ! ‘हे’ कारण देत NEET PG 2022 पुढे ढकलण्यास स्पष्ट नकार

| Updated on: May 14, 2022 | 1:28 PM

IMA ने आपल्या पत्रामध्ये नीट पीजीची परीक्षेचं आयोजन 21 मे ऐवजी नंतर केलं जावं अशी मागणी केली होती.परंतु आता या सगळ्यावरच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. NEET ची परीक्षा वेळेवरच होणार आहे. 21 मे ला ही परीक्षा घेण्यात येणार होती त्यानुसार याच तारखेला ही परीक्षा होणार आहे.

NEET PG 2022 :  न्यायालय म्हणे, सौ बात की एक बात ! हे कारण देत NEET PG 2022 पुढे ढकलण्यास स्पष्ट नकार
'पीएचडी'चा डॉक्टर आणि 'मेडिकल डॉक्टर' यातला फरक कळणार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : नीट पीजी 2021-22 (NEET PG 2021) मध्ये कोरोनामुळे (Corona) परीक्षेला उशीर झाला ज्याचा परिणाम एकूणच नीट पीजी च्या संपूर्ण शैक्षणिक वर्षावर झाला. यंदाची नीट पीजी 2022-23 (NEET PG 2022) जर उशिरा घेतली तर त्याचाही परिणाम संपूर्ण शैक्षणिक वर्षावर होऊन अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यासाठी स्पष्ट नकार दिलाय. 12 मार्चला घेण्यात येणारी नीट पीजी 2022-23 विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे 21 मे ला घेण्याची घोषणा करण्यात आली होती. तयारी करण्यासाठी मिळणारा अपुरा वेळ, इंटर्नशिप पूर्ण न होणे अशा समस्या मांडत विद्यार्थ्यांकडून या ही तारखेला विरोध करण्यात आला, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. आणखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली तर याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होईल, मुळातच परीक्षेला उशीर झाला तर पुढच्या सगळ्या प्रोसेसवर परिणाम होऊन उपलब्ध डॉक्टरांची संख्या कमी होईल आणि रुग्णांच्या देखभालीवर त्याचा गंभीर परिणाम होईल असं न्यायालयानं म्हटलं. न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या.सूर्या कांत यांच्या खंडपीठाकडून हे निर्देश देण्यात आले. नीट पीजी 2022-23 परीक्षेसाठी 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं.

IMA कडून सुद्धा सरकारला विनंती

राज्यासह देशभरात नीट पीजी (NEET PG) परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि या परीक्षेला बसणाऱ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. दरम्यान पदव्युत्तर (NEET-PG 2022) परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीये. ही परीक्षा (Exam) पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा सरकारला पत्र लिहीत केली होती. IMA ने आपल्या पत्रामध्ये नीट पीजीची परीक्षेचं आयोजन 21 मे ऐवजी नंतर केलं जावं अशी मागणी केली होती. परंतु आता या सगळ्यावरच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. NEET ची परीक्षा वेळेवरच होणार आहे. 21 मे ला ही परीक्षा घेण्यात येणार होती त्यानुसार याच तारखेला ही परीक्षा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

…यासाठी हा निर्णय घेतला जावा, अशी मागणी

2021 च्या नीट पीजी राऊंडमध्ये ज्यांना अपयश येईल, त्यांनाही 2022च्या परीक्षेला पुन्हा बसता येण्याची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, अशी मागणी केली होती. तसंच सध्याच्या घडीला नीट पीजी 2022 परीक्षेसाठी पुरेसा वेळही विद्यार्थ्यांना (Medical Students) मिळू शकलेला नाही, असंही आयएमएने म्हटलं होतं. परीक्षा पुढे का ढकलावी याचं कारण आयएमए नं पत्रात लिहिलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहीत आयएमएने ही मागणी केली होती .