NEET SS 2021 : नीट एस एस परीक्षेचं सुधारित वेळात्रक जाहीर, नोंदणी प्रक्रिया लांबणीवर

| Updated on: Sep 14, 2021 | 7:00 PM

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच एनबीई कूडन नॅशनल एलिजिबिलीट कम एंट्रान्स टेस्ट सुपर स्पेशालिटी परीक्षा नोंदणीचं सुधारित वेळापत्रक जारी केलं आहे.

NEET SS 2021 : नीट एस एस परीक्षेचं सुधारित वेळात्रक जाहीर,  नोंदणी प्रक्रिया लांबणीवर
Student
Follow us on

NEET SS 2021 नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच एनबीई कूडन नॅशनल एलिजिबिलीट कम एंट्रान्स टेस्ट सुपर स्पेशालिटी परीक्षा नोंदणीचं सुधारित वेळापत्रक जारी केलं आहे. एनबीईनं जारी केलेल्या नोटिफिकेशननसुार नीट परीक्षा एस एस साठी आज पासून सुरु होणारी नोंदणी प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन एनबीईकडून नीट एस एस परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरु कण्यात येणार आहे. 22 सप्टेंबर दुपारी 3 वाजता नोंदणी सुरु केली जाईल. तेव्हा विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. नीट एस एस परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना natboard.edu.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. nbe.edu.in या वेबसाईटवर माहिती पत्रक जारी करण्यात आलं आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

स्टेप 1 : सर्वप्रथम राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in ला भेट द्या.
स्टेप 2 : त्यानंतर होमपेजवरील NEET SS लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : एक नवीन टॅब उघडेल, येथे नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4 : संपर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा
स्टेप 5 : अर्ज केल्यानंतर प्रिंट घ्या.

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात – 22 सप्टेंबर
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस – 12 ऑक्टोबर
अर्जात दुरुस्ती – 16 ते 18 ऑक्टोबर
अर्जात अंतिम दुरुस्ती – 26 ते 28 ऑक्टोबर

या गोष्टी लक्षात ठेवा

जे उमेदवार NEET SS 2021 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छितात त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पात्रता निकष पूर्णपणे वाचून घेऊन त्यानंतर अर्ज करणं आवश्यक आहे. NEET SS 2021 परीक्षा DM / MCh आणि DrNB SS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केले जाते. NEET-SS ही प्रवेशासाठीची पात्रता आणि रँकिंग परीक्षा आहे. डीएएम, एमसीएच आणि डीआरएनबीएसएस मधील सुपरस्पेशालिटी प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते.

परीक्षा कधी होणार

NBEMS द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिसनुसार नीट एस एस परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल. NEET SS प्रवेशपत्र 5 नोव्हेंबर रोजी जारी केले जाईल. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार natboard.edu.in या संकेतस्थळावरून परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेचा निकाल आणि कट ऑफ 30 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर होईल.

नीट यूजी परीक्षा संपन्न 202 शहरात परीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा रविवारी पार पडली. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं. परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतं. परिक्षेचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं गेलं. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

बीडमध्ये 24 केंद्रावर परीक्षा

बीड मध्ये देखील एकूण 24 सेंटरवर या परीक्षा होती, निवडल्या गेलेल्या संस्थांनी याची तयारी पूर्ण केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आलाय होता. सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या सावटात विद्यार्थी परीक्षा दिल्या. दरम्यान याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत या परीक्षा संपन्न झाली.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

NEET SS 2021 Exam registration revised schedule released by National Board of Examination check all details here