AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा 100 टक्के घातपात, बड्या नेत्याचा उल्लेख करून रोहित पवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले तो नेता…

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले आहेत. अजितदादांचा घातपात झाला आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

अजितदादांचा 100 टक्के घातपात, बड्या नेत्याचा उल्लेख करून रोहित पवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले तो नेता...
rohit pawar and ajit pawar plane crashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 10, 2026 | 5:47 PM
Share

Rohit Pawar Press Conference On Ajit Pawar Plane Crash : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. अजितदादा यांचा विमान अपघात हा घात होता, असं थेट भाष्य रोहित पवार यांनी केलं. तसेच त्यांनी अजितदादा ज्या कंपनीच्या विमानातून जात होते, त्या विमान कंपनीचा मालक, पायलट यांच्यावरही शंका उपस्थित केली आहे. सोबतच अजितदादा यांचा 27 जानेवारी रोजीचा कार्यक्रम काय होता? त्यांना उशीर का झाला? अजितदादा यांनी फक्त विमानानेच प्रवास करण्यास भाग पागडले आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत. विशेष म्हणजे अजितदादांसोबत घातपात झाल्याची शंका उपस्थित करताना बडा नेता त्यांना भेटायला आला होता, असाही दावा केला. सोबतच अजितदादांचा हा अपघात नव्हता तर हा नियोजनबद्ध अपघात होता, असे थेट भाष्य करत रोहित पवार यांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांनी साधाणा 50 स्लाईडचे एक पीपीटी सादर केले. यावेळी त्यांनी अजितदादा यांच्या विमानाची माहिती दिली. सोबतच त्या विमानात असलेले पायलट, विमानाच प्रवास, बारामतीचे विमानतळ, विमान प्रवासादरम्यानचे हवामान अशा अनेक अंगानी भाष्य केले. तसेच अजितदादांसोबत घातपात झाला होता, अशी शंका उपस्थित करताना त्यांनी काही दावे केले आहेत. ‘अजितदादांसोबत घातपात झाला का? याचा शोध घेतला पाहिजे. अजितदादा हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्या अपघाताच तपास झाला पाहिजे. 27 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर चार ते पाच तास मी काम करेन. माझ्या पक्षाचे काही नेते, अधिकारी भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करेन त्यानंतर मी मुंबईला जाईल, असे अजितदादांना सांगितले होते. तसे नियोजन होते,’ असा दावा रोहित पवार यांनी केला.

मोठा नेता अजितदादांना भेटणार होता

तसेच एका बड्या नेत्याचा संदर्भ देताना “अजितदादा मुंबईला निघणार होते. त्यासाठी ताफाही लागला होता. परंतु एक फार मोठे नते दादा यांना भेटण्यासाठी वेळेत येणार होते. परंतु ते उशिराने भेटायला आले. उशिराने आल्यामुळे तसेच चर्चा लांबल्यामुळे दादांचा वेळ गेला. अजितदादा पाच-साडे पाच वाजता कारने मुंबईहून पुण्याला निघणार होते. परंतु ते गाडीन जाऊ शकले नाही. त्यांना विमान बुक करावे लागले. नंतर दुसऱ्या दिवशीचे विमान आदल्या दिवशी बुक झाले,’ असा संदर्भ रोहित पवार यांनी दिला. दरम्यान, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या शंकांमुळे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी