AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?

आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम… बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?

| Updated on: Jul 02, 2026 | 1:09 PM
Share

राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले त्यानंतर आमदारही फुटतील अशा चर्च रंगत होत्या. काही दिवसांत आणखी नेते फुटतील, असा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.

राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले त्यानंतर आमदारही फुटतील अशा चर्च रंगत होत्या. काही दिवसांत आणखी नेते फुटतील, असा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले सचिन अहिर यांनीही आणखी एक नेता शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाली.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनीही मोठं वक्तव्य करत चर्चांना उधाण आणलं आहे. “शिवसेनेत सचिन अहिर आले आहेत. आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे. आता त्याला संजय राऊत रोखू शकत नाही. सर्व खापर हे संजय राऊत यांच्यावर फुटत आहे,” असं बच्चू कडू म्हणाले. यावर सचिन अहिर यांनीही प्रतिक्रिया देताना, “आधी मला जरा स्कोअर करून देत मग संपूर्ण टीम आणेन,” असं म्हटलं आहे.

Published on: Jul 02, 2026 01:08 PM

Follow Us
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?.

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य.

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?.

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?

IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड.

IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड