AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA 2026: फक्त 10 खेळाडूंसह अमेरिकेने मिळवला विजय, गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अमेरिकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्थेत राउंड ऑफ 32 मध्ये बोस्निया हर्जेगोविनाला 2-0 ने मात दिली. तसेच राउंड ऑफ 16 चं तिकीट पक्कं केलं. मात्र या सामन्यानंतर अमेरिकन संघाला मोठा धक्का बसला आहे.

FIFA 2026: फक्त 10 खेळाडूंसह अमेरिकेने मिळवला विजय, गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी
FIFA 2026: फक्त 10 खेळाडूंसह अमेरिकेने मिळवला विजय, गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदीImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 02, 2026 | 4:41 PM
Share

USA vs Bosnia and Herzegovina, FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या यजमान देशांमध्ये अमेरिकाही आहे. असं असताना अमेरिकन संघाने या स्पर्धेत आपली चमकही दाखवली आहे. राउंड ऑफ 32 या बाद फेरीच्या सामन्यात अमेरिकेवर प्रचंड दबाव होता. मात्र त्या दबावाला झुगारून बोस्निया-ह्रर्जेगोविना संघाला 2-0 ने मात दिली. 2 जुलैला कॅलिफॉर्नियाच्या लेव्हिस स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात अमेरिकन संघाने शेवटची 26 मिनिटे 10 खेळाडूंसह खेळले. असं असूनही विजय मिळवला. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात अमेरिकेने दुसऱ्यांचा बाद फेरीचा सामना जिंकला आहे. या विजयात मोलाचा हातभार लागला तो फोलारिन बालोगुन आणि मलिक टिलमॅन याचा… या दोघांच्या गोलमुळे अमेरिकेने राउंड ऑफ 16 मध्ये तिकीट मिळवलं आहे. अमेरिकेचा पुढचा सामना बेल्जियमशी होणार आहे. पण या सामन्यात गोल करणारा खेळाडू खेळू शकणार नाही.

अमेरिकेकडून दणादण दोन गोल

फिफा स्पर्धेत अमेरिकेचा फॉरवर्ड फोलारिन बालोगुन पहिल्या हाफमध्ये दमदार खेळला. या सामन्याच्या 31 व्या मिनिटाला त्याने गोल मारला आणि आघाडी मिळवून दिली. पण रेफरीने ऑफसाइड दिला आणि गोलचं स्वप्न भंगलं. पण ही निराशा फार काळ टिकली नाही. या सामन्याच्या 45व्या मिनिटाला त्याने पुन्हा गोल मारला. पहिल्या हाफमध्ये 1 गोलची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये अमेरिकेला धक्का बसला. बोस्नियाचा फुटबॉलपटू मुहारेमोविक यांच्या पायावर पाय दिल्याने रेफरीने बालोगुनला रेड कार्ड दाखवलं. त्यामुळे शेवटची 26 मिनिटे अमेरिका 10 खेळाडूंसह खेळली.

अमेरिका दहा खेळाडूंसह शेवटच्या टप्प्यात खेळत होती. मात्र या बोस्नियाला काही बरोबरी साधता आली नाही. या सामन्याच्या 82व्या मिनिटला फ्रि किक मिळाली. यानंतर मलिक टिलमॅनने गोल मारला. यासह अमेरिकेला 2-0 ने आघाडी मिळाली. सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राहिली. शेवटची शिटी वाजली आणि अमेरिकेने विजयी जल्लोष केला.

रेड कार्ड मिळाल्याने बालोगुनला बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नाही. यासह वर्ल्डकप इतिहासात रेड कार्ड मिळवणारा अमेरिकेचा पाचवा खेळाडू ठरला. एरिक वायनाल्डा (1990), फर्नांडो क्लाविजो (1994), पाब्लो मास्ट्रोनी (2006) आणि एडी पोप (2006)  असे रेडकार्ड मिळाले आहेत.

Follow Us
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट