AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आज ‘नीट यूजी’ परीक्षा घेण्यात आली.परभणी जिल्ह्यातील निवडक केंद्रांवर आज दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात ही परीक्षा घेण्यात आली.

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप
Student
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 7:18 PM
Share

प्रशांत चलिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आज ‘नीट यूजी’ परीक्षा घेण्यात आली.परभणी जिल्ह्यातील निवडक केंद्रांवर आज दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात ही परीक्षा घेण्यात आली.पुर्णा शहरातील श्री गुरुबुध्दी महाविद्यालय हे नीट परिक्षेचे केंद्र असताना संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर परभणीचा उल्लेख असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात पडले.काही विद्यार्थ्यांची नेमके परीक्षा केंद्र कोणते? हे शोधण्यात वेळ गेला तर अनेक पालकांची गैंरसोय झाली होती.

बीडमध्ये 24 केंद्रावर परीक्षा

आज नीटच्या परीक्षा पार पडली. बीड मध्ये देखील एकूण 24 सेंटरवर या परीक्षा होती निवडल्या गेलेल्या संस्थांनी याची तयारी पूर्ण केलीय होती. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आलाय होता. सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या सावटात विद्यार्थी परीक्षा दिल्या. दरम्यान याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत या परीक्षा संपन्न झाली.

202 शहरात परीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला म्हणजेच आज आयोजित करण्यात आली आहे. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतं. परिक्षेचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं गेलं. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. गतवर्षी परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

कोरोना नियमांचं पालन

कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आलं होतं. यासह विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याचा स्लॉटही ठरविला गेला होता. फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.

नीट परीक्षेमध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं नीट परीक्षेमध्ये अखिल भारतीय कोट्यातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 27 टक्के तर आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण लागू केलं आहे. हे आरक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू असेल.

इतर बातम्या:

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

NEET 2021 : नीट यूजी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी याचिका, सुप्रीम कोर्टाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, परीक्षा कधी होणार?

NEET UG 2021: NTA कडून नीट यूजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जारी, नेमकं काय म्हटलंय?

Neet ug exam 2021 conducted at various exam center in country exam center address wrong mention in Admit card student facing Problem at Parbhani

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.