NEET UG 2021: NTA कडून नीट यूजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जारी, नेमकं काय म्हटलंय?

NEET UG 2021: NTA कडून नीट यूजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जारी, नेमकं काय म्हटलंय?
नीट

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET 2021) साठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय स्तरीय प्रवेश परीक्षेद्वारे बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठीच्या पात्रतेच्या अटी जाहीर करण्यात आल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Aug 07, 2021 | 2:06 PM

NEET UG 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET 2021) साठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय स्तरीय प्रवेश परीक्षेद्वारे बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठीच्या पात्रतेच्या अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. एनटीएने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ज्या वर्षीच्या प्रवेशासाठी अर्ज करायचा आहे त्यावर्षी 31 डिसेंबर रोजी विद्यार्थ्याचं वय 17 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय एनटीएनं इतर अटी देखील जाहीर केल्या आहेत.

शिक्षणसंस्थांचे निकष पाहावेत?

बीएससी नर्सिंगचे पात्रता निकष आयएनसीने निर्धारित केल्यानुसार आहेत. विविध नर्सिंग कॉलेज/संस्थांमध्ये बीएससी (नर्सिंग) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित महाविद्यालये/संस्था/डीम्ड विद्यापीठांमधील पात्रता आणि नियम पाहण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. एनटीएनं विद्यार्थ्यांच्या पात्रता अटी निश्चित करण्यात कोणतीही भूमिका निभावलेली नाही, आयएनसीकडून सूचना केल्याप्रमाणं निर्देश जारी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

पीसीबी सह इंग्रजी उत्तीर्ण असणं आवश्यक

NEET 2021 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (PCB) आणि इंग्रजीसह 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासह, पीसीबीमध्ये किमान 45 टक्के गुण असावेत. तसेच राज्य सरकार आणि ओपन स्कूलने मान्यताप्राप्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (एनआयओएस) मधून विज्ञान विषय आणि इंग्रजीसह उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील बीएससी नर्सिंगसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. SC, ST किंवा OBC च्या उमेदवारांना PCB मध्ये 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.

NEET PG 2021 साठी नोंदणी विंडो पुन्हा उघडणार

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने NEET PG 2021 नोंदणी प्रक्रियेबाबत एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. बोर्ड 16 ऑगस्ट 2021 रोजी नोंदणी आणि अर्जात सुधारणा करण्याची विंडो पुन्हा उघडेल. जे उमेदवार परीक्षेसाठी नोंदणी करू इच्छितात ते NBE च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. उमेदवारांची नोंदणी आणि अर्जातील सुधारणा विंडो 20 ऑगस्ट 2021 पर्यंत सुरु राहील. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान इंटर्नशिप पूर्ण करत आहेत. एनबीईनं विहित केलेले इतर सर्व निकष पूर्ण करत आहेत ते NEET-PG 2021 साठी नोंदणी करू शकतील.

इतर बातम्या:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर

जमीन खरेदी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

NEET UG 2021 NTA Issues Notice On Minimum Age Eligibility For BSc Nursing

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें