
नवी दिल्ली: इंडियन कॉऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च ऑल इंडियन एन्ट्रास एक्झामिनेशन फॉर अॅडमिशन आयसीएआर एआयईईए परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र आज जारी केलं जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयसीएआर प्रवेशपत्र आज जारी होऊ शकते. ही परीक्षा 7, 8, 9 सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते icar.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.
आयसीएआर एआयईई यूजी परीक्षा पूर्वी 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, नीट परीक्षा 12 सप्टेंबरला असल्यानं काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांच्या नाराजीनंतर परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला होता.
आसीएआर एआयईई यूजी परीक्षेचं प्रवेशपत्र आज जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असेल त्यांनी पुढील अपडेटसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. परीक्षेपूर्वी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सूचना देखील वाचाव्यात, असं आवाहन एनटीएकडून करण्यात आलं आहे.
स्टेप1 : आयसीएआर परीक्षेच्या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2: icar.nta.ac.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेजवरील प्रवेशपत्राच्या लिकंवर क्लिक करा
स्टेप3 : नवीन विंडो खुली होईल, त्यावर तुमचा तपशील नोंदवा
स्टेप 4: रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाऊनलोड करा
स्टेप 5: पुढील माहितीसाठी प्रिंट आऊट सोबत ठेवा
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, परीक्षेला जाताना न्यायची कागदपत्र यांची माहिती सविस्तरपणे वाचणं आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सूचनांचं देखील पालन करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सूचनांचं पालन करुन चूका करु नयं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. विद्यार्थी आता गेट परीक्षेची नोंदणी 2 सप्टेंबरपासून करु शकतात. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आता 2 सप्टेंबरपासून सुरू होईल. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.
इतर बातम्या :
FYJC Admission : अकरावीसाठी पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीची अखेरची संधी, दुसऱ्या फेरीची आज घोषणा
GATE Exam 2022 : गेट परीक्षेची नोंदणी लांबणीवर, ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरु
NTA to release ICAR AIEEA UG admit card today on icar.nta.ac.in