FYJC Admission : अकरावीसाठी पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीची अखेरची संधी, दुसऱ्या फेरीची आज घोषणा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 11:22 AM

मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

FYJC Admission : अकरावीसाठी पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीची अखेरची संधी, दुसऱ्या फेरीची आज घोषणा
अकरावी प्रवेशाची वेबसाईट

Follow us on

मुंबई : अकरावी प्रवेशाची FYJC (11th) पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज अखेरची संधी आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत विद्यार्थी अकरावीचे प्रवेश निश्चित करु शकतात. शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी 27 ऑगस्टला जाहीर करण्यात आली होती. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्या विद्यार्थ्यांनी आज प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे. पहिल्या यादीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

अकरावी प्रवेशाची पुढील प्रक्रिया कशी असेल?

आज रात्री दहा वाजता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केले जातील. तर, तिसऱ्या फेरीचे प्रवेश 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले जातील. यानंतर विशेष प्रवेश फेरी 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान राबवली जाणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा तपशील

अमरावती विभाग

अमरावती विभागाची प्रवेश क्षमता 11339 इतकी असून त्यापैकी 7 हजार 408 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. पहिल्या यादीत 5533 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

मुंबई विभाग

मुंबई महानगर विकास प्राधिकरणात येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची क्षमता 1 लाख 97 हजार 171 इतकी असून त्यासाठी 1 लाख 91 हजार 093 विद्यार्थ्यांनी नोदंणी केली होती. त्यापैकी 1 लाख 17 हजार 883 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

नागपूर

राज्याची राजधानी नागपूर विभागातील प्रवेशाची क्षमता 42 हजार 883 असून त्यासाठी 17 हजार 944 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 14 हजार 245 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

नाशिक

अकरावी प्रवेशसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रवेश क्षमता 20 हजार 921 इतकी आहे. तर, 16 हजार 208 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 11 हजार 850 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलेलं आहे.

पुणे

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची अकरावी प्रवेशाची क्षमता 86 हजार 482 आहे. त्यासाठी 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?

स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.

स्टेप 2: नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा

स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल

स्टेप 4 : वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा

स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल

इतर बातम्या:

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधणार?

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी? वाचा सविस्तर

Maharashtra FYJC Admission 2021 last date for confirmation first merit list admission second round details published today

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI