अकरावी प्रवेशाचं टेन्शन दूर, शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती, वर्षा गायकवाड यांच्याकडून घोषणा

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे.

अकरावी प्रवेशाचं टेन्शन दूर, शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती, वर्षा गायकवाड यांच्याकडून घोषणा
FYJC Admission POEAM APP
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 11:07 AM

मुंबई : अकरावी प्रवेशाची FYJC (11th) पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक अ‌ॅप तयार केलं आहे. POEAM असं या अ‌ॅपचं नाव आहे. विद्यार्थी या अ‌ॅपचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया पूर्म करू शकते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?

अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आता POEAM या मोबाईल अ‌ॅपचा वापर करु शकतात. विद्यार्थ्यांना हे अ‌ॅप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस वर उपलब्ध होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशा विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

दहावी बारावी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

कोरोना विषाणू ससंर्गामुळं महाराष्ट्र सरकारनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पर्यायी मूल्यांकन धोरणानुसार बोर्डानं निकाल जाहीर केले होते. या निकालामध्ये उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि ए.टी.के.टीशाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं यांसदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत.

दहावीची परीक्षा कधी?

बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बारावीची परीक्षा कधी ?

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अब्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या:

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार

पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad announced POEAM app developed for FYJC Admission Process

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.