FYJC (11th) Admission Merit List 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली यादी काही तासांवर, विद्यार्थ्यांमध्ये धडधड

FYJC (11th) Admission Merit List 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली यादी काही तासांवर, विद्यार्थ्यांमध्ये धडधड
फाईल फोटो

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी उद्या म्हणजेच 27 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ज्यांनी पूर्ण अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Aug 26, 2021 | 8:26 AM

मुंबई : अकरावी प्रवेशाची FYJC (11th) पहिली गुणवत्ता यादी उद्या म्हणजेच 27 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ज्यांनी पूर्ण अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस शाळा-कॉलेज बंद आहेत. आता गुणवत्ता यादी आणि प्रवेश प्रक्रियेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची पावलं पुन्हा शाळा-कॉलेजकडे वळतील. यावेळी कॉलेज सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असेल तर आपल्याला इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही, याविषयीची धडधड विद्यार्थ्यांच्या मनात असेल.

पहिली कट ऑफ लिस्ट उद्या म्हणजेच 27 ऑगस्टला लागणार

पहिल्या गुणवत्ता यादीत भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचे अर्ज विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत भरले होते. ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील अशा विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत.

30 ऑगस्टपूर्वी प्रवेश निश्चित करण्याची मुदत

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या 67 हजार 131 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर 66 हजार 247 विद्यार्थ्यांचे अर्जांची पडताळणी झाली आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात येईल.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलंय…?

प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी 27 ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. पहिल्या फेरीनंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाणार आहे. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिकच्या महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

(FYJC Admission First Cut off List on 27 August 2021 Education Minister Varsha Gaikwad)

संबंधित बातम्या :

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार

पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें