पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात OBC, EWS आरक्षण लागू, खुल्या प्रवर्गातील स्पर्धा तीव्र होणार? नेमकं काय घडणार
ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा निर्णय लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील जागांसाठीची स्पर्धा वाढल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई: केंद्र सरकारनं वैद्यकीय अभ्यासक्रम (PG Medical Courses) आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांमध्ये अखिल भारतीय कोट्यात 27 टक्के ओबीसी (OBC) आणि 10 टक्के ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षण लागू केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर परिणाम झाला असून जागांसाठी स्पर्धा वाढलीय. खुल्या प्रवर्गाच्या जागा 42 टक्केंनी कमी झाल्या आहेत. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा निर्णय लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील जागांसाठीची स्पर्धा वाढल्याचं दिसून आलं आहे. अखिल भारतीय कोट्यातील खुल्या प्रवहर्गाच्या जाग या वर्षी 3809 पर्यंत येतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया आणखी स्पर्धात्मक होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केंद्र सरकारनं वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केल्यानंतर काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टानं ईडब्ल्यूएस आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानुसार प्रवेश आणि समुपदेशन प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे.
खुल्या प्रवर्गाच्या जागांवर कसा होणार परिणाम?
2021 मधील प्रवेशाची संख्या
एमएस जनरल सर्जरी : 641
ईएनटी : 209
एमडी मेडिसीन : 736
पेडियाट्रिक्स : 475
ओबीजी : 612
2022 मधील प्रवेशाची संख्या
एमएस जनरल सर्जरी : 384
ईएनटी : 117
एमडी मेडिसीन : 394
पेडियाट्रिक्स : 295
ओबीजी : 335
दोन्ही वर्षातील खुल्या प्रवर्गातील प्रवेशाच्या जागांचा विचार केला असता एमएस जनरल सर्जरीच्या 257 जागा कमी होणार असून ईएनटीच्या 92,एमडी मेडिसीनच्या 342, पेडियाट्रिकच्या 180 आणि ओबीजीच्या 277 जागा कमी होणार आहेत.
खुल्या प्रवर्गातील प्रवेशाची स्पर्धा तीव्र होणार
ओबीसी आणि ईडबल्यूएस आरक्षण लागू झाल्यानंतर अखिल भारतीय कोट्यातील खुल्या प्रवर्गाची प्रवेशाची स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. कारण एखाद्या कॉलेजमध्ये खुल्या प्रवर्गासाठी अखिल भारतीय कोट्यातून 2 जागा मिळू शकतात. टाईम्स ऑफ इंडियानं यासंबंधी वृत्त प्रकाशित केलं आहे.
इतर बातम्या:
कोरोनाकाळात दुसऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करु नका, कोणी जास्त काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
OBC and EWS reservation in PG Medical courses increased competition of General Category