मोठी बातमी | बारावीच्या विद्यार्थ्यांना आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षा देण्याची अंतिम संधी!

कोरोनाच्या दरम्यान आलेल्या अध्ययन अध्यापनातील मर्यादा लक्षात घेऊन बारावीच्या सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजना यावर्षासाठी स्थगितीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मोठी बातमी | बारावीच्या विद्यार्थ्यांना आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षा देण्याची अंतिम संधी!
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 10:22 AM

मुंबई : कोरोनाच्या दरम्यान आलेल्या अध्ययन अध्यापनातील समस्या लक्षात घेऊन बारावीच्या सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजना यावर्षासाठी स्थगितीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षा देण्याची शेवटची संधी मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून बारावीसाठी सुधारित विषय योजना आणि मूल्यमापन योजनेची सुरूवात करण्यात आली होती. त्यात अवस्था, सामान्य ज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य असे काही विषय बंद करण्यात आले होते तर शाखांतील विषय निवडीचे पर्याय बदलण्यात आले होते. (Opportunity from the government so that 12th standard students are not harmed)

मात्र, याची दखल न घेता काही महाविद्यालयांनी संबंधित विषयांचे अध्यापन सुरू ठेवले आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवीन मूल्यमापन योजना या वर्षासाठी स्थगित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या वर्षासाठी शेवटची संधी म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे.

पुढील वर्षापासून अशी सवलत देता येणार नाही कनिष्ठ महाविद्यालयांनी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजनेची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. बंद झालेल्या विषयांचे आणि शाखेसाठी उपलब्ध नसलेल्या विषयांचे अध्यापन बंद करणे आवश्यक आहे असे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना एक प्रकारची संधीच दिली आहे. मात्र, पुढील वर्षी ही संधी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शासन निर्णय जारी, अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार

(Opportunity from the government so that 12th standard students are not harmed)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.