Teachers Day: नरेंद्र मोदी शिक्षा पर्व अंतर्गत 7 सप्टेंबरला संबोधित करणार, पाच उपक्रमांचाही शुभारंभ होणार

| Updated on: Sep 04, 2021 | 6:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणाऱ्या शिक्षा पर्वामध्ये 7 सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना ते संबोधित करतील.

Teachers Day: नरेंद्र मोदी शिक्षा पर्व अंतर्गत 7 सप्टेंबरला संबोधित करणार, पाच उपक्रमांचाही शुभारंभ होणार
नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणाऱ्या शिक्षा पर्वामध्ये 7 सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना ते संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी पाच उपक्रमांचाही शुभारंभ करतील. 10,000 शब्दांचा भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश, दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स, सीबीएसईची शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि मान्यता फ्रेमवर्क (एसक्यूएएएफ), स्किल इंड्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवक आणि देणगीदार आणि सीएसआर देणाऱ्यांसाठी विद्यांजली पोर्टल सुरु करणार आहेत.

शिक्षण मंत्रालय शिक्षकांचे अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन शिक्षण धोरण 2020 पुढे नेण्यासाठी 5 ते 17 सप्टेंबर पर्यंत शिक्षक पर्व साजरा करत आहे. कोरोनामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे वेबिनारद्वारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करतील. 2021 साठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त 44 शिक्षकांच्या कार्यावरील माहितीपट देखील सादर करणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारांची 1958 मध्ये सुरुवात

शिक्षकांचे राष्ट्रीय पुरस्कार प्रथम 1958 मध्ये सुरु करण्यात आले होते. तरुणांचे भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या बांधिलकीचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. 1960 च्या मध्यापासून माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबरला पुरस्कार देण्यात येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक, विद्यार्थी, पालकांना संबोधित करतील,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, सुभाष सरकार आणि राजकुमार रंजन सिंह देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 वितरण समारंभ 5 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम, आंध्र प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन शिक्षक आहेत. या वर्षी पुरस्कारप्राप्तांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील दोन शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीतील द्वारका येथील बालभारती पब्लिक स्कूल आणि राजस्थानमधील बिर्ला बालिका विद्यापीठ, झुंझुनू येथील शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, करपवंद, बस्तर, छत्तीसगडमधील एका शिक्षकाला देखील राष्ट्रीय शिक्षक पुरस्करानं सन्मानित केलं जाणार आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यामागील भूमिका

देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करणं आणि आनंद साजरा करणे, या भूमिकेतून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. शिक्षकांचा कार्याचा सन्मान करणे हा देखील यामागील उद्देश आहे. ज्या शिक्षकांनी त्यांच्या कामाप्रती वचनबद्धतेमुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासोबत विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता या पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्त केली जाते.

इतर बातम्या:

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला झटका बसण्याची शक्यता; कसा असेल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कल?

आमदारांचा पराक्रम, भर रेल्वेत चड्डी बनियनवर फिरले, आक्षेप घेताच प्रवाशांसोबतच भिडले

PM Narendra Modi will address teachers and students on September 7 other five initiatives will also start