आमदारांचा पराक्रम, भर रेल्वेत चड्डी बनियनवर फिरले, आक्षेप घेताच प्रवाशांसोबतच भिडले

बिहारचे (Bihar) एक आमदार महाशय चांगलेच चर्चेत आहेत. जनता दल युनायटेडचे (JDU) आमदार नरेंद्र कुमार नीरज (MLA Narendra Kumar Neeraj) हे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. आमदार महाशय अंडरवेअरवर ट्रेनमध्ये फिरत असताना त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे.

आमदारांचा पराक्रम, भर रेल्वेत चड्डी बनियनवर फिरले, आक्षेप घेताच प्रवाशांसोबतच भिडले
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 2:17 PM

पाटणा : बिहारचे (Bihar) एक आमदार महाशय चांगलेच चर्चेत आहेत. जनता दल युनायटेडचे (JDU) आमदार नरेंद्र कुमार नीरज (MLA Narendra Kumar Neeraj) हे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. आमदार महाशय अंडरवेअरवर ट्रेनमध्ये फिरत असताना त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. राजधानी एक्स्प्रेसमधील (Rajendra Nagar-New Delhi Rajdhani Express) हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोटोत आमदार नरेंद्र कुमार हे चड्डी बनियानवर दिसत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे या आमदार महाशयांच्या कृत्यावर सहप्रवाशांनी आक्षेप घेतला. त्यावेळी आमदारांना चांगलाच राग आला. नरेंद्र कुमार नीरज यांनी थेट प्रवाशांना शिव्याच हासडल्या. आमदार महोदय यावरच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशाला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. ही बाचाबाची सुरु असताना RPF ला बोलवावं लागलं. त्यानंतर हे प्रकरण मिटलं.

आमदार महाशय अंडरविअरमध्ये

आमदार नरेंद्र कुमार नीरज हे पाटण्यावरुन दिल्लीला तेजस राजधानी एक्स्प्रेसने निघाले होते. या प्रवासादरम्यान आमदार महाशयांनी रेल्वेतच कपडे उतरवले. पाटण्यावरुन ट्रेन सुटताच, त्यांनी कपडे उतरवले. त्यानंतर ते चड्डी-बनियनवर ट्रेनच्या डब्ब्यात चकरा मारु लागले. आमदार महाशयांचं अशा अवतारात फिरणं सहप्रवाशांना रुचलं नाही. त्यांनी आक्षेप घेत त्याबाबत विचारणा केली. त्यावर आमदारांनी विचारणा करणाऱ्या प्रवाशाला झापलं. बघता बघता दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

विरोधकांकडून नितीश कुमारांसह संयुक्त जनता दलावर सडकून टीका

दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी देखील या निमित्ताने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह संयुक्त जनता दलाला घेरलं आहे. राष्ट्रीय जनता दलाने आमदार नरेंद्र कुमार यांचा बनियनवरील फोटो ट्विट करत म्हटलं, “जेडीयूचे ब्रँड अम्बॅसिडर आणि नितीश कुमार यांचे प्रिय आमदार रेल्वेत महिलांसमोर अंडरवियरवर फिरताना.”

आमदारांचे कारनामे, उपमुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत ‘आय लव यू’ म्हटलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी एक्‍सप्रेसमधील प्रवासी प्रह्लाद पासवान यांनी या प्रकाराबाबत कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. जेडीयू आमदार गोपाल मंडल आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे कायमच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यावर बेकायदेशीरपणे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री प्रसाद यांनी “आय लव्ह यू’ म्हटले.

हेही वाचा :

पनवेलच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल, दोघांना उत्तर प्रदेशातून अटक

40 वर्षीय डॉक्टरचा महिलेवर जीव जडला, फोटो व्हायरल झाल्याने बोभाटा, बेदम मारहाण करुन जीव घेतला

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, ‘त्या’ एका फोटोमुळे चर्चांना उधाण

व्हिडीओ पाहा :

JDU MLA Narendra Kumar Neeraj seen half naked in railway photo viral

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.