AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, ‘त्या’ एका फोटोमुळे चर्चांना उधाण

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. यामध्ये व्हायरल होणारे काही फोटो थेट काळजाला भिडणारे असतात. या फोटोंची दिवसभर चर्चा होत असते. सध्या तर एक अतिशय मजेदार फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक आयएएस अधिकारी रस्त्यावर चक्क भाज्या विकायला बसला आहे. (IAS officer Akhilesh Mishra selling vegetables on road photo […]

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, 'त्या' एका फोटोमुळे चर्चांना उधाण
IAS OFFICER
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 6:57 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. यामध्ये व्हायरल होणारे काही फोटो थेट काळजाला भिडणारे असतात. या फोटोंची दिवसभर चर्चा होत असते. सध्या तर एक अतिशय मजेदार फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक आयएएस अधिकारी रस्त्यावर चक्क भाज्या विकायला बसला आहे. (IAS officer Akhilesh Mishra selling vegetables on road photo went viral on social media)

आयएएस अधिकारी थेट रस्त्यावर बसला

आयएएस अधिकारी म्हटलं की त्याचा वेगळाच थाट असतो. त्याची व्यस्तता, सुरक्षा रक्षकांचा त्याच्या भोवती असलेला गराडा, हे सगळं आपण पाहातच राहतो. मात्र, सध्या एक अतिशय वेगळाच प्रकार समोर आला आहे. हा सगळा तामझाम बाजूला ठेवून आएएस ऑफिसर अखिलेश मिश्रा हे थेट रस्त्यावर भाज्या विकायला बसले आहेत. रस्त्यावर बसून भाज्या विकायला बसल्याचा त्यांचा फोटो खूपच व्हायरल झाला आहे.

फोटो व्हायरल झाल्यामुळे द्यावे लागले स्पष्टीकरण

एक आयएएस ऑफिसर भाज्या विकायला बसल्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. फोटो व्हायरल झाल्यामुळे आयएएस ऑफिसर भाजी विकायला रस्त्यावर का बसला ? असा प्रश्न अनेकांना पडला. फोटो पाहून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. शेवटी आयएएस ऑफिसर मिश्रा यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. भाज्या विकायला बसलेल्या महिलेचे मूल दुसरीकडे कुठेतरी गेले होते. त्यामुळे महिलेने मला या भाज्या सांभाळण्यासाठी सांगितले. त्यामळे मी खाली बसलो होतो, असे आएएस ऑफिसर मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हाच तो फोटो :

View this post on Instagram

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

फोटो पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी सर तुम्ही ग्रेट आहात, असं म्हटलंय. तर काही लोकांनी मिश्रा यांना सलाम ठोकला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

Video | उंच डोंगरावर कुत्र्याची मस्ती, एका चुकीमुळे मालकाला फुटला घाम, नेमकं काय घडलं ?

Video | नावाला चिंपाझी पण काम माणसाचं, हवेत उडवतायत चक्क ड्रोन, व्हिडीओ व्हायरल !

VIDEO : ऐकावं ते नवलच! केसात साप बांधून महिला निघाली खरेदीला, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

(IAS officer Akhilesh Mishra selling vegetables on road photo went viral on social media)

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?