AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नावाला चिंपाझी पण काम माणसाचं, हवेत उडवतायत चक्क ड्रोन, व्हिडीओ व्हायरल !

या व्हिडीओमध्ये चिंपाझी चक्क ड्रोन उडवत आहेत. ड्रोनला हवेत उडवणे हे काही साधे काम नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षण घेतल्यानंतर तसेच वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ड्रोन उडवायला परवानगी मिळते.

Video | नावाला चिंपाझी पण काम माणसाचं, हवेत उडवतायत चक्क ड्रोन, व्हिडीओ व्हायरल !
chimpanzee flying drone
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 3:54 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर नेमहीच वेगवेगळ्या व्हिडीओंची चर्चा असते. सध्या चिंपाझींचा एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिंपाझी थेट ड्रोनला उडवत आहेत. त्यांचे हे कसब पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. (chimpanzee seen flying drone very fluently video went viral on social media)

ड्रोन उडवणारे चिंपाझी पाहून नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. यातील काही व्हिडीओ थक्क करुन सोडणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा तर अगदीच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये चिंपाझी चक्क ड्रोन उडवत आहेत. ड्रोनला हवेत उडवणे हे काही साधे काम नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षण घेतल्यानंतर तसेच वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ड्रोन उडवायला परवानगी मिळते. अर्थात वेगवेगळ्या देशात ड्रोन उडवण्यासाठीच्या परवानग्या आणि नियम वेगवेगळे आहेत. मात्र, या व्हिडीओमध्ये चिंपाझी थेट ड्रोन उडवत असल्यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

शिताफीने चिंपाझी ड्रोन उडवत आहेत

व्हिडओतील चिंपाझींची नजर ड्रोनवर आहे. रिमोट कंट्रोलद्वारे ते ड्रोनला चलाखीने सांभाळत आहेत. यामध्ये कसलीही चूक न करता ते ड्रोन उडवत आहेत. व्हिडीओमध्ये काही चिंपाझी खाली बसल्याचे दिसत आहे. तर काही चिंपाझी हे उभे राहून ड्रोन उडवत आहेत. त्यांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलंय असं वाटतंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हाच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : ऐकावं ते नवलच! केसात साप बांधून महिला निघाली खरेदीला, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Video: सपना चौधरीलाही टक्कर, घर घर की कहानी, हरीयानवी गाणे, देवर-भाभी दिवाने

VIDEO: शाहरुख-दीपिकाला टक्कर, आज्जीबाईंचा लुंगी डान्स, लुंगी डान्स, एकदम स्टेज तोड परफॉर्मन्स

(chimpanzee seen flying drone very fluently video went viral on social media)

Follow Us
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?