VIDEO: तुझ्या डोशाचा स्टॉलला हिंदू देवाचं नाव का दिलंस, टोळक्याची मुस्लीम तरुणाला मारहाण

Viral Video | मथुरेत या मुस्लीम तरुणाचा स्टॉल होता. या स्टॉलवर तो डोसा विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने आपल्या स्टॉलला हिंदू देवता असलेल्या श्रीनाथ जी यांचे नाव दिले आहे. हाच मुद्दा पकडून टोळक्याने त्याला मारहाण केली. तसेच स्टॉलला दिलेले श्रीनाथ जी नाव बदल अशी धमकीही दिली.

VIDEO: तुझ्या डोशाचा स्टॉलला हिंदू देवाचं नाव का दिलंस, टोळक्याची मुस्लीम तरुणाला मारहाण

भोपाळ: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश धार्मिक तणावाच्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत आहे. स्वयंघोषित हिंदुत्त्ववाद्यांकडून मुस्लीम व्यक्तींना मारहाण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आतादेखील मथुरेतील एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याठिकाणी एका मुस्लीम तरुणाला त्याच्या डोशाच्या स्टॉलवर येऊन एका टोळक्याने मारहाण केली.

प्राथमिक माहितीनुसार, मथुरेत या मुस्लीम तरुणाचा स्टॉल होता. या स्टॉलवर तो डोसा विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने आपल्या स्टॉलला हिंदू देवता असलेल्या श्रीनाथ जी यांचे नाव दिले आहे. हाच मुद्दा पकडून टोळक्याने त्याला मारहाण केली. तसेच स्टॉलला दिलेले श्रीनाथ जी नाव बदल अशी धमकीही दिली. या घटनेनंतर संबंधित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका युजरने धर्माच्या नावाने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध केला आहे. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे संबंधित युजरने म्हटले आहे. तर अन्य नेटकऱ्यांनीही धर्माच्या नावाखाली दुसऱ्यांवर जुलूम जबरदस्ती करण्याच्या वृत्तीचा निषेध केला आहे.

भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला टोळक्याची मारहाण

मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार घडला होता. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका मुस्लीम व्यक्तीवर स्थानिक तरुणांच्या टोळक्याने दादागिरी केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. उज्जैन येथील सेकली या गावात ही घटना घडली. याठिकाणी एक मुस्लीम व्यक्ती भंगारचा व्यवसाय करतो. भंगाराच्या शोधात हा व्यक्ती गावात फिरत होता. त्यावेळी स्थानिक तरुणांच्या टोळक्याने या मुस्लीम व्यक्तीकडील भंगारातील वस्तुंची फेकाफेक केली. तसेच त्याला पुन्हा गावात प्रवेश करु नको, असे बजावले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांचा शोध सुरु केला आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून लहान मुलीसमोरच वडिलांना मारहाण

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्येही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अहमद असे होते. अहमद यांना त्यांच्या लहान मुलीसमोर टोळक्याने मारहाण केली. टोळक्याने त्यांना बळजबरीने ‘जय श्रीराम’च्या घोषणाही द्यायला लावल्या होत्या.

हा सर्व प्रकार सुरु असताना अहमद यांची लहान मुलगीही त्यांच्यासोबतच होती. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने बरीच गयावया केली. मात्र, वडिलांना बिलगून रडणाऱ्या या चिमुरडीची कोणालाही दया आली नाही. टोळक्याने मारहाण करुन झाल्यानंतर अहमद यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस आल्यानंतर अहमद यांना मारहाण सुरुच होती. या घटनेवरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेकांनी टीका केली होती.

इतर बातम्या:

Breaking : राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, दिल्ली बलात्कार पीडित प्रकरणात फोटो पोस्ट केल्याबाबत कारवाई

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI