VIDEO: शाहरुख-दीपिकाला टक्कर, आज्जीबाईंचा लुंगी डान्स, लुंगी डान्स, एकदम स्टेज तोड परफॉर्मन्स

या व्हीडिओमध्ये एक साधारण सत्तरीच्या वयातील आजीबाई नाचताना दिसत आहेत. 'थलायवा' या बॉलिवूडच्या गाण्यावरील आजीबाईंचा डान्स अगदी थक्क करायला लावणार आहे. एवढे वय होऊनही आजीबाई अलीकडच्या बॉलिवूड चित्रपटांतील डान्स स्टेप्स सहजनेते करताना दिसत आहेत.

VIDEO: शाहरुख-दीपिकाला टक्कर, आज्जीबाईंचा लुंगी डान्स, लुंगी डान्स, एकदम स्टेज तोड परफॉर्मन्स


मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हीडिओ लोकांमध्ये जगण्याची किती उर्मी आणि उत्साह आहे, याचा प्रत्यय आणून देणारे असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Old Women Dance goes Viral on Social Media)

या व्हीडिओमध्ये एक साधारण सत्तरीच्या वयातील आजीबाई नाचताना दिसत आहेत. ‘थलायवा’ या बॉलिवूडच्या गाण्यावरील आजीबाईंचा डान्स अगदी थक्क करायला लावणार आहे. एवढे वय होऊनही आजीबाई अलीकडच्या बॉलिवूड चित्रपटांतील डान्स स्टेप्स सहजनेते करताना दिसत आहेत.

आजीबाईंचा एनर्जेटिक डान्स

हा व्हीडिओ घरात शूट करण्यात आला असून यामध्ये आजीबाईंचा नातूही त्यांच्यासोबत नाचताना दिसत आहे. एकूणच संपूर्ण घर आजीबाईंच्या नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आजीबाई कुठेही थकलेल्या दिसत नाहीत. संपूर्ण व्हीडिओत त्या एक सो एक डान्स स्टेप्स सादर करताना दिसतात. सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत.

63 वर्षांच्या आजीबाईंचा बहारदार डान्स

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशाच एका आजीबाईंचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. रवी बाला शर्मा (Ravi Bala Sharma) असं या आजीबाईंचं नाव होतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवी बाला शर्मा ‘कोई लड़का है, जब वो हंसता है…’ या हिंदी चित्रपटातील गीतावर डान्स करत आहेत. डान्स करताना त्या अगदीच खुलल्या आहेत. केंसाच्या दोन वेण्या बांधून त्यांनी गुलाबी ड्रेस परिधान केला आहे. विशेष म्हणजे गाण्याच्या तालावर त्या थिरकताना आपल्याला दिसत आहेत.

इतर बातम्या :

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !

Viral: ‘हा’ डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

Video | मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची ‘न्यारी बात न्याराच थाट’ ! जेम्स बॉन्डच्या थीमवर गजब सादरीकरण

(Old Women Dance goes Viral on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI