Video | मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची ‘न्यारी बात न्याराच थाट’ ! जेम्स बॉन्डच्या थीमवर गजब सादरीकरण

मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने सिंगर मॉंटी नॉर्मन यांनी जेम्स बॉन्डसाठी तयार केलेल्या थीम म्यूझिकला रिक्रिएट केले आहे.

Video | मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची 'न्यारी बात न्याराच थाट' ! जेम्स बॉन्डच्या थीमवर गजब सादरीकरण
mumbai police music


मुंबई : फक्त देशातच नाही तर जगभरात मुंबई पोलिसांची ख्याती आहे. मुंबई पोलिसांची गुन्ह्यांची उकल करण्याची पद्धत तसेच त्यांच्या कामगिरीचे नेहमीच कौतुक केले जाते. मुंबई पोलीस हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. सध्या या पोलिसांचा एक कौतुकास्पद व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांच्या बँड ग्रुपने एक दर्जेदार सादरीकरण केले आहे. त्यांनी जेम्स बॉन्डच्या थीम म्यूझिकला रिक्रिएट केलं आहे. (Mumbai police band created James Bond theme song music video went viral on social media)

जेम्स बॉन्ड चित्रपटातील म्यूझिकला रिक्रिएट केलं

मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने सिंगर मॉंटी नॉर्मन यांनी जेम्स बॉन्डसाठी तयार केलेल्या थीम म्यूझिकला रिक्रिएट केले आहे. सोबतच मुंबई पोलिसांनी अभिनेता डॅनियल क्रेगच्या ‘नो टाईम टू डाय’ या चित्रपटातील गाण्याला घेऊन मध्येच सादरीकरणामध्ये ट्विस्ट आणला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ :

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस अतिशय तालबद्ध पद्धतीने संगिताचे सादरीकरण करत आहेत. एक पोलीस बाकीच्या पोलिसांना मार्गदर्शन करताना दिसतोय. तर बाकीचे पोलीस मिळत असलेल्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळी वाद्ये वाजवत आहेत.

प्रशांत दामले यांनीही व्हिडीओ शेअर केला

हा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या ऑफिशियल अकाऊंट्सवर अपलोड केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच काही लोक तर उत्स्फूर्तपणे शेअरसुद्धा करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनीही त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर या व्हिडीओला शेअर केले असून हा व्हिडीओ पाहायलाच हवा, असे कॅप्सन दिले आहे.

इतर बातम्या :

Video | भर मंडपात तोंडात गुटखा टाकला, नवरीने नवरदेवाला पाहुण्यांसमोर झापलं, व्हिडीओ पाहाच !

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

Video | वहिनीचा स्लीव्हलेस ब्लाऊज, पिवळ्या रंगाची साडी, दिरासोबतच्या डान्सने आग लावली, व्हिडीओ पाहाच !

(Mumbai police band created James Bond theme song music video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI