मुंबई : सध्या इंटरनेटचं (Internet) हे जग खूप पुढे गेलं आहे आणि यात प्रत्येकाला आपली खास ओळख निर्माण करण्याची इच्छा आहे. सोशल मीडियामुळे (Social Media) अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत त्यात तुम्ही तुमची कला सादर करुन प्रसिद्धी मिळवू शकता. असेच अनेक लोक डान्स (Dance), गाणं (Singing), मिमीक्री आणि स्टंट अशा प्रकारच्या कला सादर करत लोकांचं मनोरंजन करत असतात. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत तिघं जण सुंदर डान्स करताना दिसत आहेत.