मुंबई : प्राणी पाळण्याची सवय अनेकांना असते. काही लोक मांजर, कुत्रा असे प्राणी आवडीने पाळतात. एवढेच नाही तर काही लोकांना पाळलेले प्राणी आपल्या घरातील सदस्य असल्यासारखेच वाटते. मात्र, हेच प्राणी कधीकधी डोकेदुखी होऊन जातात. या प्राण्यांकडून कधी-कधी वेगळंच काहीतरी होऊन जातं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा डोंगरावरुन खाली पडता-पडता वाचला आहे. त्याला वाचवताना एका माणसाला चांगलीच कसरत करावी लागलीय. (man saves dog falling from cliff video went viral on social media)