प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवा!, पुण्यात प्राध्यापकांचं 28 व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन, सरकारची भूमिका काय?

| Updated on: Aug 15, 2021 | 1:21 PM

महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या नेतृत्वात पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर 19 जुलैपासून आंदोलन करण्यात येत आहे. सेट नेट पात्रताधारकांच्या या आंदोलनाला 28 दिवस उलटले आहेत.

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवा!, पुण्यात प्राध्यापकांचं 28 व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन, सरकारची भूमिका काय?
प्राध्यापक भरती आंदोलन
Follow us on

पुणे: महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवर घालण्यात आलेली बंद उठवावी यासाठी पुण्यात आंदोलन सुरु आहे. 100 टक्के पदभरती करावी, सीएचबी प्राध्यापकांचं थकित मानधन द्यावं या मागणीसाठी पुण्यात महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. 19 जुलैपासून आंदोलन सुरु असून स्वातंत्र्यदिनादिवशी राज्य सरकारनं मागण्यांकडे लक्ष द्यावं, यासाठी आंदोलक प्राध्यापकांच्या अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलकांनी राज्य सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालायचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवा

प्राध्यापक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी, सीएचबी प्राध्यापकांना थकित वेतन द्यावं, या मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन कऱण्यात आलं. महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्यावतीनं सेट नेट पात्रताधारकांनी, सीएचबी प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचे अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं आहे.

100 टक्के भरती करावी

पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाबाहेर प्राध्यापकांनी आंदोलन केलं आहे. महाविद्यालय,अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विनाअट 100 टक्के प्राध्यापक भरती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आंदोलक प्राध्यापक काय म्हणाले?

राज्यात गेल्या अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे होत नाही. राज्यातील महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा रिक्त असल्यानं शिक्षणावर परिणाम होत आहे. सेट नेट परीक्षांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मात्र, त्याप्रमाणं भरती होत नाही. राज्य सरकारच्या वतीनं फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. उदय सामंत यांनी आश्वासन दिलं होतं त्यावर कार्यवाही झालेली नाही. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचंही आंदोलक प्राध्यापकांनी सांगितलं.

सीएचबीचं थकित मानधन द्या

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांना थकीत वेतन मिळावे या मागण्यांसाठी पुण्यात प्राध्यापकांनी आंदोलन केलं आहे.

28 दिवसांपासून आंदोलन

महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या नेतृत्वात पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर 19 जुलैपासून आंदोलन करण्यात येत आहे. सेट नेट पात्रताधारकांच्या या आंदोलनाला 28 दिवस उलटले आहेत. प्राध्यापकांच्या या मागण्यांकडे राज्य सरकारकडून कसा प्रतिसाद दिला जातोय, हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

पेन्शनबाबत मोठी बातमी; सरकार मुलांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नियमांमध्ये बदल होणार

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

Professor Recruitment Protest at Pune from last 28 days by Maharashtra Nav Pradhyapak Sanghtana