TET Exam Scam : 2021 च्या टीईटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय, पुणे पोलीस तपास करणार, सरकारच्या समितीकडूनही कसून चौकशी

2018 आणि 2020 च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर पुणे पोलिसांना 2021 च्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. पुणे पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरु केला आहे.

TET Exam Scam : 2021 च्या टीईटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय, पुणे पोलीस तपास करणार, सरकारच्या समितीकडूनही कसून चौकशी
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 9:02 AM

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) म्हणजेच टीईटी परीक्षेत गैरप्रकार (TET Exam Scam) झाल्याचं उघड झालं आहे. 2018 आणि 2020 च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर पुणे पोलिसांना (Pune Cyber Police) 2021 च्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. पुणे पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरु केला आहे. तर, राज्य सरकारच्या समितीकडून देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची कसून चौकशी करण्यात येत आहे.

यावर्षीच्या टीईटीतही गैरप्रकाराचा संशय

यावर्षीची टीईटी 21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. 2018 व 2020 च्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी तुकाराम सुपे, सुखदेव डेरे याच्यासह आणखी काहीजण अटकेत आहेत.2021 च्या परीक्षेत काही गैरव्यवहार झालाय का ? या संदर्भात पुणे पोलीस तपास करणार आहेत.

पुणे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील काही अधिकारी ,कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 2021 च्या परीक्षा आयोजनाचं ज्या विनर कंपनीकडे होते त्या कंपनीच्या सौरभ तिवारी याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. विनर कंपनीला दिलेल्या कामाच्या संदर्भात कंपनीची काही कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला जाणार असल्याची माहिती आहे.

राज्य सरकारच्या समितीकडूनही चौकशी

राज्य सरकार देखील टीईटी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर खडबडून जागं झालं आहे. तुकाराम सुपे याला निलंबित करण्यात आलं असून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या चौकशी समितीकडून देखील टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात कसून चौकशी केली जातीय. टीईटी परीक्षा गैरप्रकारातील सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम समिती करत आहे. चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसात सादर होणार आहे.

900 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा संशय

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेचे एकूण 3 कोटी 93 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टीईटी परीक्षा प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात 900 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा पुणे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख अश्विनकुमारच्या बंगलोरच्या घरातून 24 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि काही हिरे पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी तुकाराम सुपे ,अश्विन कुमार,अभिषेक सावरिकर,सुखदेव डेरे ,सौरभ त्रिपाठी यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आलीय.

इतर बातम्या:

Pariksha Pe Charcha : नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, मन की बात मधून रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर

TET exam Scam : पुणे पोलिसांचा धडाका सुरुच, आश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोनं, 24 किलो चांदी जप्त

Pune Cyber Police suspect scam also done in Maha TET exam 2021 started investigation