RSS ची नवी विद्यापीठं! विद्यापीठं उभी करण्यामागे RSS चं नेमकं उद्दिष्ट काय?

| Updated on: Sep 27, 2022 | 11:49 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बऱ्याच काळापासून देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचे काम करतंय. आता मात्र या संस्थेच्या उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणावर भर देण्यात येणार आहे.

RSS ची नवी विद्यापीठं! विद्यापीठं उभी करण्यामागे RSS चं नेमकं उद्दिष्ट काय?
RSS Colleges Universities
Image Credit source: Social Media
Follow us on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेले विद्या भारती देशभरात 5 नवीन विद्यापीठं सुरु करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बऱ्याच काळापासून देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचे काम करतंय. आता मात्र या संस्थेच्या उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या उद्दिष्टाच्या दिशेने पाऊल म्हणून देशभरात 5 नवीन विद्यापीठं सुरु करण्यात येणार आहेत. विद्या भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव यतींद्र शर्मा यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या एका कार्यक्रमात याला दुजोरा दिलाय.

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वीच चाणक्य विद्यापीठ सुरु केलंय. या विद्यापीठाच्या हिल्या तुकडीसाठी एकूण २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. आसाम मधल्या गुवाहाटीमध्ये आणखी एका विद्यापीठाचं काम सुरु आहे. आरएसएस शी सलग्न असलेल्या विद्या भारतीच्या शाळांतील सुमारे 50 विद्यार्थ्यांना या विद्यापीठात मोफत शिक्षण दिले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित शैक्षणिक संस्था सर्व वर्ग, जाती- पंथांतील विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत असं यतींद्र शर्मा यांनी म्हटलंय. त्यांच्या 29,000 शाळांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे अशी माहिती देखील त्यांनी दिलीये.

केंद्राने सुरू केलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 बद्दल जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न विद्या भारतीने नुकतीच एक मोहीम जाहीर केली. ‘भारतकेंद्रित शिक्षणा’ वर भर देणे, प्रकाश टाकणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. 11 सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झालीये.

एनईपीवर सरकारला मदत करण्याचे उद्दीष्ट असल्याची घोषणा करताना संघटनेचे सरचिटणीस श्रीराम आरवकर म्हणाले, देशभरातील शाळांचे मोठे जाळे असल्याने एनईपीच्या अंमलबजावणीत सरकारला मदत करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.