Scholarship Exam : मोक्कार पोरं ! नाशिकमधल्या पोरांना शिष्यवृत्तीची भारी आवड, ‘इतक्या’ संख्येने अर्ज भरलेत

| Updated on: Apr 26, 2022 | 7:56 PM

राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलीये. शिष्यवृत्तीची परीक्षा ही राज्यभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे. 20 जुलैला इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

Scholarship Exam : मोक्कार पोरं ! नाशिकमधल्या पोरांना शिष्यवृत्तीची भारी आवड, इतक्या संख्येने अर्ज भरलेत
नाशिकमधल्या पोरांना शिष्यवृत्तीची भारी आवड
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) इयत्ता पाचवी व आठवीच्या एकूण 37 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये. पाचवीसाठी 20 हजार, आठवीसाठी 17 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेत. राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची (Examination) तारीख जाहीर (Announce) करण्यात आलीये. शिष्यवृत्तीची परीक्षा ही राज्यभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे. 20 जुलैला इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता ही संधी

टीईटी परीक्षेचा घोटाळा आणि कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर पडली होती. या परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 एप्रिल या तारखा दिलेल्या आहेत. या आधी हे अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला होता परंतु काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता ही संधी देण्यात आलीये. या परीक्षांच्या अधिसूचना परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेत

महत्त्वाचे

राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेतली जाते शिष्यवृत्ती परीक्षा

राज्यभरात एकाच दिवशी होणार शिष्यवृत्ती परीक्षा

येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार

विद्यार्थी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका! छाती ठोकत म्हणाले, जय भीम, वंदे मातरम, एसटी कामगार

Aaditya Thackeray Meet Ashwini Vaishnaw : आदित्य ठाकरे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या भेटीला