Chhagan Bhujbal Uncut PC : पवारांचा हात धरून राजकारण शिकलो, असं मोदींनीही सांगितलंय : छगन भुजबळ

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पवारांचा हात धरून राजकारण शिकलो असे सांगितले

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 26, 2022 | 8:10 PM

नाशिकः शरद पवारांनी (Sharad Pawar) जातीयवादाला खतपाणी घातले, असा आरोप आतापर्यंत कुणीही केला नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील पवारांचा हात धरून राजकारण शिकलो असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करण्यात अर्थ नाही, म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पवारांवर असे आरोप केले होते. त्याला भुजबळांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. भुजबळ यांनी यावेळी राज ठाकरेच्या सभेवर टिपण्णी केली. ते म्हणाले, पोलिसांचे म्हणणे जागेसंदर्भात आहे. सुरक्षा आणि गर्दीच्या दृष्टीने त्यांनी विचार केला असेल. मनसेचे तिथले नेते आणि प्रशासन चर्चा करून तो प्रश्न सोडवतील. केंद्राने नवनीत राणा प्रकरणावर अहवाल मागवला असेल, तर 24 काय 12 तासात देऊ असे उत्तर त्यांनी दिले. किरीट सोमय्या यांचे करमणुकीचे कार्यक्रम असतात म्हणत त्यावर बोलणे टाळले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें