GATE 2021 score card : IIT बॉम्बेने स्कोअर कार्ड केले जारी, थेट लिंकवरून करा डाउनलोड

| Updated on: Mar 28, 2021 | 8:30 PM

30 जूनपर्यंत गेट स्कोअर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध असेल. मात्र त्यानंतर, जुलै ते डिसेंबर या कालावधीत ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागेल. (Score card issued by IIT Bombay, download directly gate.iitb.ac.in link)

GATE 2021 score card : IIT बॉम्बेने स्कोअर कार्ड केले जारी, थेट लिंकवरून करा डाउनलोड
IIT बॉम्बेने स्कोअर कार्ड केले जारी, थेट लिंकवरून करा डाउनलोड
Follow us on

मुंबई : गेट 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने आज स्कोअरकार्ड जाहीर केले. उमेदवार आपले स्कोरकार्ड अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर डाउनलोड करू शकतात. उमेदवार केवळ गेट स्कोरकार्ड वापरू शकतात जे जारी होण्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी वैध असते. 30 जूनपर्यंत गेट स्कोअर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध असेल. मात्र त्यानंतर, जुलै ते डिसेंबर या कालावधीत ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागेल. (Score card issued by IIT Bombay, download directly gate.iitb.ac.in link)

गेट 2021 स्कोअर कार्ड : असे करा डाउनलोड

1. अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर जा
2. मुख्यपृष्ठावर डाउनलोड योर स्कोअर कार्ड वर क्लिक करा.
3. आपल्याला एका नवीन पृष्ठावर पाठविले जाईल
4. क्रेडेन्शियल्स वापरुन लॉग इन करा
5: स्कोअरकार्ड दिसून येईल आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करा.

उमेदवारांना मुलाखत द्यावी लागेल

गेटमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU) नोकरी मिळविण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पूर्ण लागेल. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-बॉम्बे) ने नुकतीच ग्रॅज्युएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजीनिअरिंग (GATE) 2021 चा निकाल जाहीर केला. परीक्षा 14 फेब्रुवारी रोजी संपली होती. ज्यामध्ये यावर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी 78 टक्के विद्यार्थी सहभागी झाले होते.

20 मार्च रोजी जाहीर झाला गेटचा निकाल

अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam declared) परीक्षेचा निकाल 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. गेट परीक्षेला एकूण 9 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 75 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 17.82 टक्के एवढी आहे. आयआयटी बॉम्बेनं गेट परीक्षेचे आयोजन केले होते, त्यांनी गेट परीक्षेतील टॉपर्सची यादी जाहीर केली होती.

एकूण 27 पेपर्ससाठी परीक्षा

ही परीक्षा एकूण 27 पेपर्ससाठी घेण्यात आली होती, त्यामध्ये दोन नवीन विषय समाविष्ट करण्यात आले होते. या विषयात पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि ह्युमॅनिटिज आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. तसेच कोविड -19 महामारीमुळे गेट 2021 मध्ये अर्ज करण्यासाठी किमान पात्रतेत सवलत देण्यात आली होती. घोषणेनुसार, पदव्युत्तर पदवीसाठी तृतीय वर्षाचे उमेदवार गेट 2021 साठी पात्र होते. (Score card issued by IIT Bombay, download directly gate.iitb.ac.in link)

इतर बातम्या

फिरकीटपटूंसमोर विराट फेल! इंग्लंडच्या ‘या’ दोन गोलंदाजांनी नऊ वेळा आऊट केलं

म्यानमार 114 आंदोलकांची हत्या, अंतिम संस्कारावेळीही सैन्याचा गोळीबार