
इयत्ता 10 वी अथवा 12 वीनंतर तुम्ही काय शिकता अथवा तुम्हाला आयुष्याच्या एका टप्प्यात काय करायचे यावरून जीवनाची दिशा ठरते. अनेक जणांना चाकोरीबद्ध आयुष्य हवं असतं. काहींना वळणावळणावरून जावं वाटतं. तर काही जणांचं नेमकं महत्त्वाच्या वेळी काहीच ठरतं नाही. काही जण आता मेहनत करून म्हणजे चांगला अभ्यास करून पुढे महत्त्वाची पदं भुषवतात. तर काही जणं आता आळस करून पुढे आयुष्यभर गदा मेहनत करतात, असे म्हटले जाते. त्यामुळे आयुष्याच्या या टर्निंग पाईंटवर तुम्हाला नेमकं काय करायचं याचं नियोजन करा. तुमचा विचार पक्का करा. ही काही व्यावसायिक कोर्सेस तुम्हाला तुमचे भविष्य घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकतील.
करिअरची निवड म्हणजे आर्थिक यशाचा पाया
योग्य वयात, तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडले तर तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होता. आता बदलत्या जगाचा पासवर्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याआधारे तुम्ही मोठा पल्ला गाठू शकता. योग्य वेळेत करिअरची निवड केली तर तुमचे भविष्य सुरक्षित राहू शकते.
हे कोर्स तुम्हाला करिअरमध्ये मदत करतील
डिजिटल मार्केटिंग : सोशल मीडिया मार्केटिंग, SEO, ईमेल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन यामध्ये आता करिअरच्या संधी
डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स : Python, मशीन लर्निंग, डेटा व्हिज्युअलायझेशन यासह इतर प्रकार भविष्य घडवतील.
वेब डेव्हलपमेंट : HTML, CSS, JavaScript, React, Backend Technologies (Node.js, Django) आता अनेक जण त्यांचे संकेतस्थळ तयार करुन घेत आहे.
मोबाईल अॅप डेव्हलपमेंट : Android (Kotlin/Java), iOS (Swift), Flutter ही करिअरची वेगळी वाट निवडता येईल.
ग्राफिक डिझाईन : Photoshop, Illustrator, UI/UX डिझाईन, Canva यासह ग्राफिक डिझाईनचा कोर्स करता येईल.
सायबर सिक्युरिटी : नेटवर्क सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, इंफॉर्मेशन सिक्युरिटी, हा कोर्स सध्या ट्रेडिंग
अकाउंटिंग आणि टॅक्सेशन : Tally, GST, Income Tax Filing, Excel for Accounting हा सध्याचा महत्त्वाचा कोर्स
हॉटेल मॅनेजमेंट आणि फूड सर्व्हिस : कुकिंग, हाऊसकीपिंग, रिसेप्शन मॅनेजमेंट, कस्टमर सर्व्हिस हा एक पर्याय आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट : इव्हेंट प्लॅनिंग, बजेटिंग, क्लायंट डीलिंग, व्हेंडर मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरची वाट निवडता येईल.
फॅशन डिझाईन आणि टेक्सटाईल टेक्नॉलॉजी : स्केचिंग, कपड्यांचे डिझाईन, ट्रेंड अॅनालिसिस, प्रॉडक्शन मॅनेजमेंट या शाखेची आवड असेल तर हे करिअर तुमच्यासाठी योग ठरेल.