छोट्या भावाने कपड्यांच्या दुकानावर काम करून मोठ्या भावाला शिकवले आणि मोठा भाऊ झाला सहाय्यक कमांडंट ऑफिसर!

जवळपास चाळीस-पन्नास घर असलेले गाव अठराविश्व दारिद्र्य आणि जेमतेम कोरडवाहू शेती ही कहाणी आहे परभणीच्या विजयकुमार सोळंकेची (Vijaykumar Solanke)

छोट्या भावाने कपड्यांच्या दुकानावर काम करून मोठ्या भावाला शिकवले आणि मोठा भाऊ झाला सहाय्यक कमांडंट ऑफिसर!
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 7:02 PM

परभणी : जवळपास चाळीस-पन्नास घर असलेले गाव अठराविश्व दारिद्र्य आणि जेमतेम कोरडवाहू शेती ही कहाणी आहे परभणीच्या विजयकुमार सोळंकेची (Vijaykumar Solanke) पण असे म्हणतात ना, जर तुमच्यामध्ये जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. असेच काही विजयकुमार सोळंकेसोबत घडले आहे.

नुकताच UPSC परीक्षेत निकाल जाहिर झाला त्यामध्ये विजयकुमार सोळंके भारतामधून 141 आला असून त्याची सहाय्यक कमांडंट ऑफिसर पदावर नियुक्ती देखील झाली आहे. पूर्णा तालुक्यातील बानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विजयकुमार मनोहर सोळंके याने यूपीएससी परीक्षेत घणघणीत यश मिळून विशेष प्राविण्यासह पास झाला आहे. पालम तालुक्यात कांजलगाव येथील मुळ रहिवासी असलेले सोळंके कुटुंबिय सध्या परभणी येथे दत्तधाम परिसरात वास्तव्यास आहेत. (Success of Vijaykumar Solanke in UPSC examination appointed as Assistant Commandant Officer)

विजयकुमारचे महाविघालयीन शिक्षण सोनपेठ येथील महालिंगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे त्यांने नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संकुलात फार्मसी अभ्यासक्रम पुर्ण केला. मात्र, हा सर्व प्रवास विजयकुमारसाठी सोप्पा नव्हता कारण विजयकुमारच्या घरी परिस्थिती जेमतेम यासर्व शिक्षणासाठी खर्च तर येणारच होता यामुळे विजयकुमारचा लहान्या भावाने कपड्यांच्या दुकानावर काम केले तर वडिलांनी शेती विकली आणि विजयला शिकवले.

या यशानंतर विजयकुमार म्हणाला की, कमतरतेमुळे माझे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण मामाच्या गावी म्हणजे बानेगाव गावाला झाले आणि तेथेच माझ्या जीवनाला कलाटणी भेटली. शिस्तप्रिय मामा यांच्या सानिध्यात व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांच्यामुळे शैक्षणिक व शारीरिक व्यक्तिमत्व तर घडलेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली.

पुढे फार्मसीला ऍडमिशन घेतले. पदवी शेवटच्या वर्षी मुख्य प्रवाह सोबत चालण्यापेक्षा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचे ठरवले. त्यानुसार IAS/IPS साठी प्रिपरेशन सुरू केले. पण योग्य मार्गदर्शनाच्या भावाने 2018 च्या पहिल्या प्रयत्नात अपेक्षित आलं .दरम्यान मामांनी दुसऱ्या परीक्षाही द्यावयाचा असे सुचवले. IPS महेश भागवत सर व काही स्पर्धा परीक्षा सिनियर्स ने UPSC CAPF AC असे या स्पर्धा परीक्षा विषयी सुचवले. सकाळी सात ते रात्री अकरा असा प्रवास सुरू झाला.या परीक्षेसाठी 25 वर्षाची मर्यादा आहे.त्यामुळे तयारीसाठी एकच वर्ष हातात होते. मेहनत करून पहिल्याच वर्षी UPSC CAPF AC 2019 परीक्षा उत्तीर्ण झालो.

संबंधित बातम्या : 

Special Story | बारावीनंतर UPSC ची तयारी कशी करावी, पाहा

(Success of Vijaykumar Solanke in UPSC examination appointed as Assistant Commandant Officer)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.