पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवावा लागणार, यूजीसीनं सूचना मागवल्या

| Updated on: May 22, 2021 | 1:12 PM

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. (Online Teaching)

पदवीचा 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवावा लागणार, यूजीसीनं सूचना मागवल्या
UCG
Follow us on

नवी दिल्ली: महाविद्यालय आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मिश्र पद्धतीनं अध्यापन या वरील मसुद्यामध्ये याविषयीचा उल्लेख केला आहे. या मसुद्याबाबत देशभरातील तज्ज्ञांकडून त्यांची मते मागवण्यात आली आहेत. (UGC Committee suggests up to 40 percent teaching of syllabus teach via online education mode)

40 टक्के ऑनलाईन 60 टक्के ऑफलाईन

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याविषयी माहिती दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा उच्च शिक्षणसंस्थांमध्ये 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन तर 60 टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन मोडद्वारे शिकवण्यासाठी परवानगी देण्याचा विचार आहे. याशिवाय अभ्यासक्रमाची परीक्षा देखील ऑनलाईन घेतली जाऊ शकते, असं रजनीश जैन म्हणाले.

मिश्र अध्यापन पद्धतीचा फायदा

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे बनवण्यात येत असलेल्या मसुद्यानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यायानामध्ये चांगल्या पद्धतीने विषय समजून घेता येईल. शिक्षणाची प्रक्रिया प्रभावीपणे घडावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने या मसुद्यावर संकल्पना आणि मते मागवली आहेत. हा मसुदा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेला आहे. या समितीतील तज्ञांच्या मतानुसार अध्ययन आणि अध्यापन यामध्ये या नवीन शिक्षणामुळे समोरासमोर बसून घेतलेले शिक्षण आणि डिजीटल माध्यमातून शिक्षण घेता येईल.

शिक्षकांनी प्रशिक्षक मार्गदर्शक बनावं

नव्या शिक्षण धोरणानुसार मिश्र शिक्षण पद्धती राबवल्यास शिक्षकांना ज्ञानदान करण्याच्या भूमिकेपासून पुढे जाऊन प्रशिक्षक आणि मार्गदर्शक व्हावं लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडेल. याशिवाय मसुदा समितीने मूल्यांकनावर लक्ष द्यावं असं सूचित केलं आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सातत्यपूर्ण मूल्यांकनाला प्रोत्साहन दिलं जावं, अशी भूमिका देखील तज्ज्ञ समितीनं मांडली आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद!

भाजपची आणखी काही वतनं खालसा, बालभारतीत आता नव्या नियुक्त्या

(UGC Committee suggests up to 40 percent teaching of syllabus teach via online education mode)