University Exams : आंदोलनं बंद करा, गप अभ्यास करा ! ठरलंय !! विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठातील परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय.सोमवारी, 25 एप्रिल 2022 रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली.

University Exams : आंदोलनं बंद करा, गप अभ्यास करा ! ठरलंय !! विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत
विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 26, 2022 | 1:02 PM

मुंबई : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर कोरोना (Corona) काळात घेतले गेलेले अनेक निर्णय शिक्षण संस्थांनी बदलले, काही नियम (Rules)पूर्वीसारखे लागू केले, काही रद्द झाले, काही तसेच ठेवण्यात आले. कोरोना लाटेत सगळ्याच प्रकारच्या परीक्षा (Examinations) जास्तीत ऑनलाइन घेण्याकडे सरकारचा कल होता. आता शाळा, महाविद्यालये सुरु झालीत त्यामुळे परीक्षा सुद्धा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला जातोय. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठातील परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय.सोमवारी, 25 एप्रिल 2022 रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली.

उदय सामंतांनी ट्विटर वरून दिली माहिती

आज यासंदर्भात उदय सामंतांनी ट्विटर वरून देखील माहिती दिली आहे. कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठाचे कुलगुरू ठाम आहेत असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय. परीक्षा घेताना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना प्रश्न संच देण्यात येईल त्याचबरोबर 2 पेपरमध्ये 2 दिवसाचं अंतर असणार आहे असंही त्यांनी सांगितलंय.विद्यापीठांच्या परीक्षा 1 जून ते 15 जुलै पर्यंत होतील. आधी याच परीक्षा मे मध्ये होणार होणार होत्या.

यापूर्वी सुद्धा विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं होतं. आता कुलगुरूंसोबत घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मात्र ऑफलाइन परीक्षांच्या विरोधात आहेत. काही ठिकाणी विरोध म्हणून आंदोलनं देखील सुरु आहेत.

इतर बातम्या :

MPSC : एमपीएसीच्या परीक्षेच्या उत्तरसुचीत चुका, लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांनी सादर केले पुरावे

Chanakya Niti: समोरच्या व्यक्तीला कसं ओळखावं? आचार्य चाणक्य यांची ‘ही’ शिकवण ठेवा लक्षात

Navneet Rana: राणा दाम्पत्यांना दिलासा नाहीच, 29 एप्रिलला सुनावणी; तोपर्यंत कोठडीतच मुक्काम