UPSC CDS 2 Final Result 2021: यूपीएससी सीडीएस 2 चा अंतिम निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा निकाल

| Updated on: Aug 12, 2022 | 11:33 AM

अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. उमेदवार 30 दिवस त्यांचे गुण तपासू शकणार आणि डाउनलोड करू शकणार आहेत.

UPSC CDS 2 Final Result 2021: यूपीएससी सीडीएस 2 चा अंतिम निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा निकाल
Follow us on

UPSC CDS 2 Result 2021 Out at upsc.gov.in, Sarkari Result 2022: योग्य आणि पात्र उमेदवारांना (i) चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीसाठी 116 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (NT) (पुरुष) आणि (ii) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीसाठी 30 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (नॉन-टेक्निकल) साठी प्रवेश मिळणार आहे. त्या परीक्षेच्या निकालाची लिंक खाली देण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाकडून (UPSC) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) साठी UPSC CDS 2 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जे परीक्षार्थी एकत्रित संरक्षण सेवा परीक्षेसाठी बसले होते त्या उमेदवारांचे निकाल आता लोकसेवा आयोगाची (UPSC) अधिकृत वेबसाइट upsc.gov.in या लिंकवर त्यांचे निकाल पाहू शकणार आहेत.

पात्र उमेदवारांना (i) 116 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी (NT) (पुरुष) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई आणि (ii) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई, 30 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (नॉन-टेक्निकल) यासाठी आता प्रवेश मिळणार आहे. हा अभ्यासक्रम आता ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण 214 जणांना पात्र उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये 139 पुरुष आणि 75 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या परीक्षेचा तुम्हाला जर निकाल पाहायचा असेल तर तो पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता.

UPSC CDS 2 Result 2021 for OTA: या पुढील स्टेप्सनुसार तुम्हाला निकाल पाहता येणार

स्टेप्स 1: सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
स्टेप्स 2: मुख्य पेजवरील What’s New विभागातील ”Final Result: Combined Defence Services Examination (II), 2021 (OTA)’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप्स 3: या ठिकाणी तुम्हाला तुमचा अंतिम निकाल PDF लिंकवर पाहायला मिळू शकणार
स्टेप्स 4: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या नावाची आणि रोल नंबरची PDF येथे पाहायला मिळणार
स्टेप्स 5: तुमचा रोल नंबर तपासा, PDF डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ते तुमच्याकडे ठेवा.

उमेदवारांना सूचना

अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. उमेदवार 30 दिवस त्यांचे गुण तपासू शकणार आणि डाउनलोड करू शकणार आहेत. परीक्षेतील उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वेबसाइटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.