मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा? ते म्हणून मोकळे झाले, ‘बेलपत्राला मध लावा, शिवलिंगाला वाहा, पास व्हा’ पण…

| Updated on: May 18, 2022 | 3:56 PM

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. यूझर्सने प्रदीप मिश्रांवर बहिष्कार टाकण्याच्या कमेंट्स केल्या, काहींनी याला अशास्त्रीय म्हटलं. परंतु त्या नंतर जे झालं ते याही पेक्षा जास्त वायरल झालं.

मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा? ते म्हणून मोकळे झाले, बेलपत्राला मध लावा, शिवलिंगाला वाहा, पास व्हा पण...
कथावाचक प्रदीप मिश्रा
Image Credit source: Twitter
Follow us on

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कथाकार प्रदीप मिश्रा (Pradip Mishra) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता. प्रदीप मिश्रा यांनी दावा केला होता की, जर एखाद्या मुलाने वर्षभर अभ्यास केला नसेल आणि त्याला वाटत असेल की तो उत्तीर्ण होणार नाही. त्या मुलाने बेलपत्रावर मध लावून शिवलिंगावर ठेवावं, असं केल्यास मुलगा पास होईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. यूझर्सने प्रदीप मिश्रांवर बहिष्कार टाकण्याच्या कमेंट्स केल्या, काहींनी याला अशास्त्रीय म्हटलं. परंतु त्या नंतर जे झालं ते याही पेक्षा जास्त वायरल झालं. बेलपत्र शिवलिंगावर वाहिल्यावर परीक्षेत पास होणार असा दावा करणाऱ्या प्रदीप मिश्रांचा स्वतःचा मुलगा आठवीच्या परीक्षेत नापास झाला अशा आशयाचं एक ट्विट वायरल झालं. ट्रॉलर्स ने तर या ट्विटला डोक्यावर घेतलं.

या ट्विटच्या आधारे सोशल मीडिया यूजर्स निवेदक प्रदीप मिश्रा यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलंय. ‘मुलाने वर्षभर कोणत्याही विषयाचा अभ्यास केला नाही तर बेलपत्रावर मध टाकून मुलाकडून शिवलिंगावर चिकटवून तो पास होईल,’ असं ज्ञान देणारे निवेदक प्रदीप मिश्रा यांचा मुलगा- आठवी नापास झाला.

मुलगा नापास झाल्याची बातमी खोटी !

दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार या बाबतची चौकशी केली असता प्रदीप मिश्रांचा मुलगा आठवीत नापास झाला नसून उत्तीर्ण झाला असल्याचं समोर आलंय. या तपासात एक फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात 8 वी च्या वर्गात आपल्या मुलाच्या अपयशाबद्दल एक अपप्रचार केला जात आहे, जो निंदनीय आहे. तो पास झाला, असा खोटा प्रचार बंद करा रिपोर्ट कार्ड तुमच्या सर्वांसमोर आहे असं म्हटलं गेलंय. सोबतच रिपोर्ट कार्ड सुद्धा पोस्ट मध्ये लावण्यात आलंय.