Dhule Loksabha Results : धुळे लोकसभा निकाल 2019

धुळे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. यंदा इथे 56.68% मतदानाची नोंद झाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 1 टक्क्यांनी घट झाली. या मतदारसंघात भाजपकडून डॉ सुभाष भामरे तर काँग्रेसकडून आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत झाली. शिवाय इथे आमदार अनिल गोटे अपक्ष रिंगणात होते.  महापालिकेच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात सूत्रं दिल्यानं […]

Dhule Loksabha Results : धुळे लोकसभा निकाल 2019
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

धुळे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. यंदा इथे 56.68% मतदानाची नोंद झाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 1 टक्क्यांनी घट झाली. या मतदारसंघात भाजपकडून डॉ सुभाष भामरे तर काँग्रेसकडून आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत झाली. शिवाय इथे आमदार अनिल गोटे अपक्ष रिंगणात होते.  महापालिकेच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात सूत्रं दिल्यानं भाजप आमदार अनिल गोटे हे नाराज झाले होते. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत बंड पुकारले आणि आपली वेगळी चूल मांडली.

पक्ष उमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना सुभाष भामरे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीकुणाल पाटील (काँग्रेस)
अपक्ष/इतर