Solapur Lok Sabha Results : सोलापूर लोकसभा निकाल 2019

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

सोलापुरात दोन मतदारसंघ आहेत. सोलापूर मतदारसंघ आणि माढा मतदारसंघांचा सोलापूर जिल्ह्यात येतात. सोलापूर लोकसभा निकाल – Solapur Lok Sabha Results : सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन […]

Solapur Lok Sabha Results : सोलापूर लोकसभा निकाल 2019
Follow us on

सोलापुरात दोन मतदारसंघ आहेत. सोलापूर मतदारसंघ आणि माढा मतदारसंघांचा सोलापूर जिल्ह्यात येतात.

सोलापूर लोकसभा निकाल – Solapur Lok Sabha Results : सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरप्रकाश आंबेडकर (VBA)पराभूत

माढा लोकसभा निकाल – Madha Lok Sabha Results : माढा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63.58% टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1.5 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपाकडून रणजीतसिंह निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्यात प्रमुख लढत जरी झाली असली, तरी ही लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात असल्याचं पाहायला मिळालं. 2014 मध्ये मोदी लाटेत सुद्धा माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खोत यांनी कडवी झुंज दिली होती.

 

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंजय शिंदे (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरअ‍ॅड. विजय मोरे (VBA)पराभूत