भाजपची पहिली यादी जाहीर, 34 उमेदवारांना मिळाली संधी; तिकीट वाटपात जातीय समीकरण ?

| Updated on: Jan 21, 2022 | 7:01 PM

पक्षाने पहिल्या यादीत जातीय समीकरणाची पूर्ण काळजी घेतल्याचे पाहायवयास मिळत आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर, 34 उमेदवारांना मिळाली संधी; तिकीट वाटपात जातीय समीकरण ?
फाईल फोटो
Follow us on

पंजाब – पंजाबच्या निवडणुकीत (PUNJAB ELECTION) कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सद्या सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या (CONGRESS PARTY) विरोधात आज भाजपने (BJP) आपली 34 उमेदवारांची पहिली यादी (FIRST LIST) जाहीर केली. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (HARDIP PURI) यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपचे जातीचं राजकारण डोळ्यासमोर ठेऊन तिकीट वाटप केल्याची भाजपमध्ये चर्चा आहे.

पक्षाने पहिल्या यादीत जातीय समीकरणाची पूर्ण काळजी घेतल्याचे पाहायवयास मिळत आहे. 12 तिकिटे शेतकरी समाजातून आलेल्या उमेदवारांना देण्यात आली आहेत. तसेच 13 शीखही उतरले आहेत, 8 अनुसूचित जातींनाही तिकीट मिळाले असून महिला, डॉक्टरांचीही उपस्थिती पहिल्या यादीत आहे.

यांना मिळाली उमेदवारी

जालंधर सेंट्रलमधून – मनोरंजन कालिया, दसुहामधून – रघुनाथ राणा, गडशंकरमधून – नमिषा मेहता, तरनतारनमधून – नवरीत सिंग लवली, मुकेरियातून – जंगलीलाल महाजन, लुधियाना सेंट्रलमधून – गुरुदेव शर्मा, फतेहगढ साहिबमधून – दीदार सिंग भाटी, अमृतसर उत्तरमधून – सरदार सुखविंदर. सिंग पिंटू, हरगोबिंदपूरमधून – बलजिंदर सिंग डकोह, सुजानपूरमधून – दिनेश सिंग बब्बू, चब्बेवालमधून – डॉ.दिलभाग राय, अमलोकसे – कंवर वीर सिंग तोहरा यांना तिकीट देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला

सीएम चन्नी दुसर्‍या जागेवरूनही निवडणूक लढवू शकतात, या वस्तुस्थितीवर हरदीप पुरी यांनीही खिल्ली उडवली. कारण त्यांना माहित आहे, की एका जागेवरून निवडणूक लढवून जिंकणार नाही. तसेच चन्नी यांनी आधी नवज्योतसिंग सिद्धूसोबतचे संबंध सुधारावेत, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

जातीय समीकरण
12 तिकिटे शेतकरी समाज
13 शीख
8 अनुसूचित जातीं
डॉक्टर आणि महिलांचाही समावेश

Goa Assembly Election : पणजीतूनच अपक्ष म्हणून लढणार, उत्पल पर्रिकरांची घोषणा; उत्पल यांची एकला चलोची भूमिका भाजपला नडणार?

School Reopen : कोरोनाकाळात सोमवारपासून शाळा सुरू, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्लॅन काय? शिक्षणमंत्री म्हणतात…

Maharashtra News Live Update : पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही – देवेंद्र फडणवीस