महाविकास आघाडीतला जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर, शरद पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन जो वाद सुरु होता तो चव्हाट्यावर आल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद व्हायला हवी होती. त्यामध्ये सर्व उमेदवारांची एकत्रितपणे घोषणा व्हायला हवी होती. तसेच चर्चा सुरु असताना उमेदवारांची घोषणा व्हायला नको होती, असं मत शरद पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीतला जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर, शरद पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 8:56 PM

महाविकास आघाडीत अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच आज बघायला मिळालं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरु होतं. प्रत्येक बैठकीनंतर जागावाटपात कोणताही तिढा नाही. आमची चर्चा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिली जात होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संयम पाळला जात होता. आघाडीतील मतभेद माध्यमांसमोर किंवा जगासमोर येऊ नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते. पण अखेर आज महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले. ठाकरे गटाने आज 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. पण यापैकी दोन जागांवर काँग्रेसने दावा सांगितला. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर अतिशय टोकाच्या शब्दांत विरोध केला. तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम सांगलीच्या जागेसाठी दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले. या सर्व घडामोडींमुळे महायुतीच्या नेत्यांना मविआविरोधात निशाणा साधण्यासाठी संधी मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरुन झालेल्या वादावर राष्ट्रवादी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अंतर्गत बैठकीत शरद पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाची आज ससंदीय बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. “महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष आघाडी धर्माचं पालन करताना दिसत नाहीत. काँग्रेस आणि ठाकरे गटाने आघाडी धर्माचं पालन केलं नाही”, असं शरद पवार बैठकीत म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करायला हवं होतं’

“महाविकास आघाडीला संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकत्र जागावाटपाची घोषणा जाहीर करायला हवी होती. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना एकत्रितपणे समोर यायला हवं होतं आणि एकत्र पत्रकार परिषद घ्यायला हवी होती”, असं शरद पवारांनी म्हटलं. “जागावाटपावर चर्चा सुरु होती तर महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनी वेगवेगळ्या जागांची घोषणा का केली?”, असा प्रश्न शरद पवारांनी बैठकीत उपस्थित केला.

शरद पवार गटाकडून 5 उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता शरद पवार गट आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीला संयुक्त पत्रकार परिषद घेऊनच जागावाटप जाहीर करायचं होतं. पण आता सर्वच पक्ष वेगवेगळ्या जागांवर उमेदवारांची घोषणा करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लवकरच लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत एकूण पाच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन 5 उमेदवारांची घोषणा करतील. पक्षाच्या संसदीय बैठकीत 10 जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.