
मुंबई महानगरपालिकेचा निकाल अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 115 मध्ये मनेसे या पक्षाने विजय मिळवला आहे. उमेदवार ज्योती राजभोज या विजयी ठरल्या आहेत.
महानगरपालिका निवडणुकांचा निकाल हा अंतिम टप्प्यात आला आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या 25 जागा आल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 जाहा आल्या आहेत.
भाजप – 25,
शिवसेना शिंदे – 03,
युवा स्वाभिमान – 12,
राष्ट्रवादी AP – 11,
काँग्रेस – 16,
UBT – 02,
BSP – 03,
एमआयएम- 10,
वंचित – 01
सांगली महानगरपालिकेच्या चार प्रभागात भाजपच्या अनेक जागा आल्याचे पाहायला मिळत. वाचा पहिल्या चार प्रभागांचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 1 (भाजपा पॅनल विजयी)
रवींद्र सदामते
माया गडदे
पद्मश्री पाटील
चेतन सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 2
प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप)
गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी)
मालुसरे महावीर खोत (भाजप )
प्रकाश रमेश पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक 3
संदीप आवटी – भाजपा
शिवसेनेचे सागर वनखंडे
राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे
राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी
प्रभाग क्रमांक 4
निरंजन सुरेश आवटे भाजप
मोहन दत्तात्रय वाटवे भाजप
विद्या बाबासाहेब नलवडे भाजप
अपर्णा विवेक मोटे भाजप
मुंबई वॉर्ड क्रमांक 93मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी कांबळे विजयी झाल्या आहेत. मुंबईत ठाकरे 63 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामधील वॉर्ड क्रमांक 93 हा महत्त्वाचा होता.
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग 20मध्ये एके वेगळे चित्र पहायला मिळत आहे. प्रभाग 20 मध्ये काँग्रेसच्या जयश्री धनाजी कांबळे, भाजपच्या सुरेखा सुनील ओटवकर, भाजपच्या वैभव अविनाश कुंभार, भाजपच्या नेहा अभय तेंडुलकर आणि शिवसेनेचे अभिजित शामराव हे निवडून आले आहेय
मुंबई महानगरपालिका निवडणूकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 63 जागांवर आघाडीवर आहे. प्रभाग 26 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धर्मेंद्र काळे विजयी ठरले आहेत. तर प्रभाग 25मध्ये भाजपच्या निशा परुळेकर बंगेरा आणि प्रभाग 24मध्ये स्वाती जैस्वाल या विजयी झाल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा निकाल जवळपास समोर आला आहे. मुंबईतील प्रभाग 20 मध्ये दीपक बाळा तावडे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग 21 मधील लीना देहरकर आणि प्रभाग 22 मधून हिमांशी पारेख विजयी झाले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजप एकूण 96 जागांवर आघाडीवर आहे. मुंबईतील प्रभाग 13मध्ये भाजपच्या राणी द्विवेदी निघुट निवडून आल्या आहेत. तर प्रभाग 14मधून भाजपच्या सीमा शिंदे विजयी झाल्या आहेत.
पुण्यातून दोन उमेदवार तुरुंगातून निवडणूक लढत होते. पुणे प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढत असलेल्या लक्ष्मी आंदेकर या निवडून आल्या आहेत. यापूर्वी सोनाली आंदेकर विजयी झाल्याचे समोर आले होते. दोघीही आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत.
कुर्ला शिवसृष्टीमधील प्रभाग क्रमांग क्रमांक 163मधून शिवसेनेच्या शैला दिलीप लांडे विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 165 मधून काँग्रेसच्या अश्रफ आजमी विजयी, प्रभाग क्रमांकतून 166 शिवसेनेच्या मीनल तुर्डे, प्रभाग क्रमांक 167 मधून काँग्रेसचे डॉ. समन आजमी, प्रभाग क्रमांक 168 मधून राष्ट्रवादीच्या साईदा खान, प्रभाग क्रमांक 169तून ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर विजयी झाल्या आहेत.
वरळी वॉर्ड क्रमांक 197 हा उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. पण आता येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग 197मध्ये वनिता दत्ता नरवणकर या विजयी झाल्या आहेत. वरळीत शिंदेंचा हा पहिलाच नगरसेवक विजयी झाला आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली होती. त्यांनी रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे. सोनाली आंदेकर या वनराज आंदेकर यांच्या पत्नी असून प्रभाग 23 मधून विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूरात काँग्रेसची हवा पाहायला मिळत आहे. प्रभाग १ मध्ये तीन काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एक उमेदवार हा शिवसेनेचा आहे. सुभाष बुचडे, रुपाली पवार आणि सचिन हरिष चौगुले हे काँग्रेसचे विजयी उमेदवार आहेत. तर गीता जाधव या शिवसेनेच्या विजेती उमेदवार आहेत.
राज्यातील अनेक महापालिकांचे निकाल हाती आले असून राज्यात भाजपने अनेक महापालिकांवर विजय मिळवला आहे. अशातच आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यांचे आतापर्यंत 45 उमेदवार विजयी झाले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा निकाला जवळपास समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. या प्रभागात भाजपचे तीन उमेदवार आले आहेत. तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार आला आहे. अपर्णा डोके, मनिषा चिंचवडे आणि सुरेश भोईर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अनंत कोऱ्हाळे जिंकले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील भाजपची हवा पाहायला मिळाली आहे. प्रभाग 22 मध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. नीता पाडळे, कोमल काळे आणि विनोद नढे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोकणे देखील निवडून आले.
मुंबई महानगरापालिका प्रभाग 1मधून फोरम परमार, शीतल म्हात्रे आणि रेखा यादव हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधील शिंदेच्या शिवसेनेच्या रेखा यादव विजयी झाल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 169मध्ये मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर निवडणूक लढत होता. ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर यांच्याकडून जय कुडाळकरचा पराभव झाला आहे. शिंदेच्या शिवसेने जय मंगेश कुडाळकर यांना 7051 मत मिळाले. तर उद्धव ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर यांना 8021 मते मिळाली आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिकांचे निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. आतापर्यंत कोणत्या पक्षाने सर्वात जास्त उमेदवार निवडणून आले याबाबत सविस्तर माहिती पाहूयात.
भाजप-1241
शिवसेना- 322
काँग्रेस-252
शिवसेना UBT- 145
राष्ट्रवादी Ap- 123
एमआयएम- 75
NCP(SP)- 25
वंचित- 14
मनसे- 13
इतर- 191
मुंबई प्रभाग 25मध्ये भाजपच्या निशा परुळेकर विजयी झाल्या आहेत. सध्या भाजप आणि शिवसेना 125 ठिकाणी आघाडीवर आहे.
एकनाथ शिंदे राहात असलेल्या वॉर्डमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार शहाजी खुपसे 667 मतांनी विजयी झाले आहेत.
ठाण्यात भाजपमधील एक अख्खे पॅनेल आले आहे. प्रभाग 21 मधील सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये संजय वाघुले, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी यांचा समावेश आहे. चारही उमेदवार हे भाजपचे आहेत.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे मिलिंद भालेराव यांचा पराभव केला आहे. प्रथमेश गीते 12559 मतांनी विजयी झाले आहेत.
मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रभागामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांचा पराभव झाला असून भाजपाचे नवीन सिंग विजयी झाले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा स्पष्ट निकाल समोर येत आहे. मुंबईतील प्रभाग 175 मधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मानसी सामतकर विजयी झाल्या आहेत. मुंबईतील वॉर्ड 175मधून एकूण 12 उमेदवार मैदानात होते. पण मानसी या विजयी ठरल्या आहेत.
Maharashtra Election Nagarsevak Winners List 2026 LIVE: राज्यातील 29 महापालिका निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान करण्यात आले. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. तर, आज 16 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आघाडीवर आहे. तर भाजप आणि शिंदेची सेना एकूण 129 जागांवर आघाडीवर आहेत. राज्यात एक हाती भाजपची सत्ता येणार असल्याचे एकूणच चित्र दिसत आहे. आता राज्यातील इतर महापालिकांमध्ये कोणते उमेदवार विजयी झाले जाणून घ्या अपडेट एका क्लिकवर…