मनोहर पर्रीकर हे संघटन शरण होते, संघटनेची कोणतीचं गोष्ट नाकारली नाही; उत्पलने सुध्दा संघटनेची तत्त्वं पाळावीत: फडणवीस

| Updated on: Jan 21, 2022 | 6:13 PM

त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात निवडून यावे, आम्ही पाच वर्षांनी त्यांना पणजीत उमेदवारी देऊ असे त्यांना सांगितले. मी आजच त्यांना शब्द दिला...पण मी म्हणतो तसंच करा असे होणार नाही. त्यांनी समजून घ्यावे, असे करू नये आणि ते करणार नाहीत.

मनोहर पर्रीकर हे संघटन शरण होते, संघटनेची कोणतीचं गोष्ट नाकारली नाही; उत्पलने सुध्दा संघटनेची तत्त्वं पाळावीत: फडणवीस
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस
Follow us on

गोवा – गोवा निवडणुकीच्या (GOA ELECTION) पहिल्या यादीत (FIRST LIST) डावलल्यानंतर उत्पल पर्रीकर (UTPAL PARRIKAR) हे कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यातचं “मनोहरभाई पर्रीकर (MANOHAR PARRIKAR)  हेदेखील संघटन शरण होते. संघटनेने एखादी गोष्ट सांगितली तर ती त्यांनी कधी नाकारली नाही. आपण भाजपला विचार आणि तत्व सांगत आहोत. तर भाजपचे (BJP) तत्व देखील आपण मानले पाहिजे, आमची अपेक्षा आहे की याठिकाणी उत्पलनी आम्ही सांगितलेल्या जागांवर विचार केला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

उत्पल पर्रीकर यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. तसेच त्यांनी जाहीर नाराजी देखील बोलून दाखवली होती. त्यामुळे अपक्ष म्हणून लढण्यास उत्पल पर्रीकर सक्षम असल्याची चर्चा गोव्यात आहे. परंतु उत्कल पर्रीकर नेमका निर्णय काय घेणार याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.

5 वर्षांनी पणजी मिळेल
त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात निवडून यावे, आम्ही पाच वर्षांनी त्यांना पणजीत उमेदवारी देऊ असे त्यांना सांगितले. मी आजच त्यांना शब्द दिला…पण मी म्हणतो तसंच करा असे होणार नाही. त्यांनी समजून घ्यावे, असे करू नये आणि ते करणार नाहीत.

शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना थांबण्याचा आमचा प्रयत्न
शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू. कारण मनोहरभाईचा परिवार आमचा परिवार आहे. या पक्षात त्यांचे योगदान आहे, पक्षाने त्यांना दिले आहे…हे एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्य ऐकत नसला तरी समजवणे ही आमची जबाबदारी आहे.

पणजीतून भाजपच्या या नेत्याला उमेदवारी
सरकार स्थिर करायचे होते त्यावेळी बाबुश पक्षात आले. ते पोटनिवडणुकीत निवडून आले होते.आणि अशा या परिस्थितीत आपण जी कमीटमेंट दिली त्यापासून दूर जाता येणार नाही. पक्षाची अडचण उत्पल यांनी समजून घ्यावी.

हा पक्ष काँग्रेससाठी डोकेदुखी
तृणमूल आमच्यासाठी नाही तर कांग्रेससाठी डोकेदुखी आहे. आणि सगळ्यात जास्त गोव्यासाठी डोकेदुखी आहे. तृणमूल पक्ष ज्या वेगाने गोव्यात वर त्याच वेगाने खाली आला आहे. आणि तो बुडता बुडता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाही बुडवणार आहे.

दुस-या जागेचा विचार नाही, माझी भूमिका ठाम आहे; मी पणजीतूनच लढणार

उत्पल पर्रिकरांसाठी जाहीर उमेदवार मागे घेण्याची शिवसेनेची तयारी, आता फडणवीसांचं सविस्तर उत्तर

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? प्रियंका गांधी म्हणाल्या, सगळीकडे मीच तर दिसतेय !