
राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. 15 जानेवारी महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत मुंबईची महानगरपालिका सर्वाधिक चर्चेत होती. मुंबईची पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगलीच ताकद लावली होती. दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, अजित पवार यांच्या पदरात निराशा आल्याचे पाहायला मिळत आहे. आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले जाणून घ्या…
अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो असे म्हटले आहे.
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 16, 2026
काय म्हणाले अजित पवार?
पुढे ते पोस्टमध्ये म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो. यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर रहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो.
पुण्याची महानगरपालिका जिंकण्यासाठी अजित पवार यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. पण अजित पवार यांना पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे अपयश मिळाले आहे.