नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुसंडी, थेट ‘इतक्या’ जागांवर बाजी!

| Updated on: Mar 02, 2023 | 9:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागालँडमध्ये एकूण 60 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील मोठी मुसंडी मारली आहे.

नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुसंडी, थेट इतक्या जागांवर बाजी!
Follow us on

कोहिमा (नागालँड) : नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Election Result)) महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील मुसंडी मारली आहे. नागालँडमध्ये एकूण 60 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत तब्बल 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा विजय झालाय. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी गोष्ट आहे. निवडणूक आयोगाकडून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार हा निकाल आहे. या आकडेवारीनुसार नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या सहा जागा पक्क्या झाल्या आहेत. तर आणखी एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे, अशी माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे याआधी नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेला. नागालँडच्या 2018च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सहा जागांवर उभे होते. पण त्यावेळी एकाही उमेदवाराला यश मिळाले नव्हते. सर्व जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची डिपॉजिट जप्त झाली होती. दुसरीकडे त्यावेळी भाजपने 12 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 12 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवलेला. तर काँग्रेसने 18 जागांवर प्रयत्न केलेला. पण काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळालं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे नागालँडमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या दोन उमेदवारांनी निवडणूक जिंकली आहे. आठवले यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी सहा उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

1) A Pongshi Phom
2) Y. Mankhao Konyak
3) P Longon
4) S. Toiho Yeptho
5) Namri Nchang
6) Y Mhonbemo Humtsoe

नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपीच्या युतीला स्पष्ट बहुमत

दुसरीकडे, नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी अर्थात एनडीपीपी पक्ष आणि भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो हे आता पाचव्यांचा नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. एनडीपीपी आणि भाजप यांच्या युतीला 60 पैकी 37 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री रियो यांनी ज्येष्ठ नेते एस सी जमीर यांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यांनी तीनवेळा राज्याचं नेतृत्व केलं आहे.