AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Party Wise Maharashtra Election Results 2026 LIVE: पुण्यात अजित पवारांना धक्का, भाजप 49 जागांवर आघाडीवर

| Updated on: Jan 16, 2026 | 12:07 PM
Share

Party Wise Maharashtra Mahapalika Election Results 2026 LIVE: राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल हाती येत असून अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे.

Party Wise Maharashtra Election Results 2026 LIVE: पुण्यात अजित पवारांना धक्का, भाजप 49 जागांवर आघाडीवर

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jan 2026 12:07 PM (IST)

    पुण्यात अजित पवारांना धक्का, भाजप 49 जागांवर आघाडीवर

    पुणे महापालिकांचे निकाल हे खळबळजनक असून अजित पवारांना मोठा धक्का मिळत असल्याचे दिसत आहे. पुण्यात भाजपचे 49 उमेदवार आघाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 12:01 PM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : राज्यात शिवसेना UBT आणि NCP (AP) मध्ये काटे की टक्कर

    राज्यातील निवडणुकांच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये शिवसेना UBT आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 83 उमेदवार तर अजित पवार यांच्या पक्षाचे 83 उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:57 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : मोठी बातमी, राज्यात काँग्रेसची सेंचुरी

    राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असून यामध्ये काँग्रेसने देखील बाजी मारली आहे. राज्यात काँग्रेसचे 147 उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:53 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : मोठी बातमी, ठाण्यात शिंदेंची शिवसेना आघाडीवर

    ठाणे महापालिकेचे निकाल सध्या समोर आले असून यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 20 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:45 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी

    जळगावच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या उमेदवार जयश्री महाजन, सुनील महाजन, राब याबी खान आणि रितिक ढेकळे या चारही जणांचा विजय झाला आहे. शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी महापौर जयश्री महाजन, पती सुनील महाजन या दोघांचा विजय झाला आहे.

  • 16 Jan 2026 11:44 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : मुंबईत शिवसेनेच्या किती जागा?

    राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती येत असून मुंबईमध्ये शिवसेनेचे 34 उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:39 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : ठाण्यात भाजप 20 जागांवर आघाडीवर

    ठाणे महानगरपालिकांचे निकाल समोर आले आहे. यामध्ये भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 11:31 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : मुंबईत महानगरपालिकेत भाजपची बाजी

    मुंबई महापालिकांचे निकाल हाती येत असून आतापर्यंत हात आलेल्या निकालांमध्ये भाजप आघाडीवर असून भाजपचे 45 उमेदवार आघाडीवर आहेत.

  • 16 Jan 2026 11:28 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : राज्यात भाजप 496 जागांवर आघाडीवर

    BJP Maharashtra Election Results 2026 : राज्यातील महापालिकांचे निकाल हाती येत असून भाजप हा सर्वात जास्त आघाडीवर असून आतापर्यंत भाजपचे 496 जागांवर आघाडी आहे.

  • 16 Jan 2026 11:19 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : राज्यात भाजपनंतर शिवसेनेची सेंचुरी, 139 जागांवर शिवसेना आघाडीवर

    Shivsena Maharashtra Election Results 2026 : राज्यातील महापालिकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून सध्या राज्यात शिवसेना पक्ष हा 139 जागांवर आघाडीवर आहे.

  • 16 Jan 2026 11:11 AM (IST)

    BJP Maharashtra Election Results 2026 : राज्यात भाजप 393 जागांवर आघाडीवर

    BJP Maharashtra Election Results 2026 : सर्वात मोठी बातमी, राज्यातील अनेक महानगरपालिकांचे निकाल सध्या समोर येत आहेत. यामध्ये राज्यात सर्वात जास्त जागांवर आघाडीवर असाणारा पक्ष भाजप आहे. भाजप सध्या 393 जागांवर आघाडीवर.

  • 16 Jan 2026 10:52 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: प्रभाग क्रमांक 1 ते 3 मध्ये EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप

    जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 ते 3 इथल्या मतमोजणीच्या ठिकाणी ईव्हीएम मशीनचे सील फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटलेले असल्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्यासह सहकर्मचाऱ्यांकडून पाहणी सुरू आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक तसंच आयुक्त या प्रकाराची माहिती घेत आहेत.

  • 16 Jan 2026 10:52 AM (IST)

    Municipal Corporation Kolhapur Election Results 2026 : कोल्हापूर भाजपाने मारली बाजी 3 उमेदवार विजयी…

    कोल्हापूरमधून प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपाचे 4 उमदेवार विजयी झाले आहेत. भाजपाने मोठी बाजी कोल्हापूरमध्ये मारल्याचे येणाऱ्या निकालावरून दिसत आहे.

राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज राज्यातील महानगरपालिकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून यामध्ये सर्वात आघाडीवर भाजप पक्ष आहे. सध्या अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड, नांदेड, सांगली, सातारा या महापालिकांच्या निवडणुकीकांचे निकाल समोर येत आहे. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांसाठी ही निवडणकू प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेच्या नजरा या मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांच्या निकालावर आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. साधारणपणे सायंकाळपर्यंत राज्यातील 29 महापालिकांचे निकाल  स्पष्ट होतील. प्रशासनाकडून या निवडणुकीचे जय्यत तयारी करण्यात आली. या  29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालाचे सर्व अपडेट तुम्ही tv9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगवर पाहू शकता.

राज्यातील महानगरपालिकांचा सर्वात वेगवान निकाल टीव्ही 9 मराठीवर 

Published On - Jan 16,2026 10:46 AM

Follow us
भाजपवर काँग्रेसची मुसंडी! काँग्रेस 14 तर भाजप 6 जागी पुढे
भाजपवर काँग्रेसची मुसंडी! काँग्रेस 14 तर भाजप 6 जागी पुढे.
मुंबईत भाजप-ठाकरे गटात चुरस, मुंबई प्रभाग क्र. 87 मध्ये भाजप आघाडीवर
मुंबईत भाजप-ठाकरे गटात चुरस, मुंबई प्रभाग क्र. 87 मध्ये भाजप आघाडीवर.
अजितदादांना मोठा धक्का, पुण्यात NCP ला फटका तर भाजपची मुसंडी
अजितदादांना मोठा धक्का, पुण्यात NCP ला फटका तर भाजपची मुसंडी.
Pune Municipal Election Results 2026 : गुंड गजा मारणेची पत्नी पिछाडीवर
Pune Municipal Election Results 2026 : गुंड गजा मारणेची पत्नी पिछाडीवर.
मोठी बातमी, मुंबईचा पहिला निकाल हाती, काँग्रेसच्या आशा काळे विजयी
मोठी बातमी, मुंबईचा पहिला निकाल हाती, काँग्रेसच्या आशा काळे विजयी.
संभाजीनगरात तिरंगी लढत! चुरशीच्या लढतीत कोण पुढे? पाहा लाईव्ह कल
संभाजीनगरात तिरंगी लढत! चुरशीच्या लढतीत कोण पुढे? पाहा लाईव्ह कल.
मुंबईत सरवणकरांचं टेन्शन वाढल! पिछाडी वाढली, उबाठा इतक्या मतांनी पुढं
मुंबईत सरवणकरांचं टेन्शन वाढल! पिछाडी वाढली, उबाठा इतक्या मतांनी पुढं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट कुटुंबाची आघाडी
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट कुटुंबाची आघाडी.
भाजपची मुसंडी; अजितदादांची राष्ट्रवादी मात्र अद्याप 13 जागांवर अडकली!
भाजपची मुसंडी; अजितदादांची राष्ट्रवादी मात्र अद्याप 13 जागांवर अडकली!.
महापालिकेचा रणसंग्राम! मुंबईत एकट्या भाजपची 50 जागांवर आघाडी
महापालिकेचा रणसंग्राम! मुंबईत एकट्या भाजपची 50 जागांवर आघाडी.