पंतप्रधान, गृहमंत्री यांनी उत्पल पर्रीकरांचा मन वळवण्याचा केला प्रयत्न; पण पर्रीकर या मतदारसंघावर ठाम

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर तिथे निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपकडून बाबूश मोंसेरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने त्यांना तिथं फायनल करण्यात आल्याचं समजतंय.

पंतप्रधान, गृहमंत्री यांनी उत्पल पर्रीकरांचा मन वळवण्याचा केला प्रयत्न; पण पर्रीकर या मतदारसंघावर ठाम
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलगा उत्पल पर्रीकर
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 11:01 AM

गोवा – अनेक दिवसांपासून गोव्याच्या (goa) राजकारणात एक वेगळाच रंग चढल्याचं आपण पाहतोय. कारण गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांच्या मुलाला उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जाहीर झालं आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर भाजप सोडणार ? किंवा अपक्ष म्हणून उभा राहणार की इतर पक्षात प्रवेश करणार या गोष्टीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

बंडाच्या भूमिकेत असलेले उत्पल पर्रीकर नेमका कोणता निर्णय घेणार हे लवकरचं स्पष्ट होईल. कारण सद्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून काही दिवसात मुदतीच्या आगोदर त्यांना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करावा लागेल.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर तिथे निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपकडून बाबूश मोंसेरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने त्यांना तिथं फायनल करण्यात आल्याचं समजतंय.

भाजपला तोडगा काढण्यात यश मिळतंय की उत्पल पर्रीकर यांना थांबवण्यात यश मिळतंय हे सुध्दा लवकरचं स्पष्ट होईल. भाजपच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत बैठक होणार त्यामध्ये गोव्यातील उमेदवार यादीवर होणार शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर उत्पल पर्रीकर हे आपला निर्णय ठरवतील.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्पल पर्रीकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण उत्पल हे पणजीतुन निवडणूक लढवण्यावर ठाम.

दोन दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे उमटले होते राज्यात पडसाद उमटले होते.

VIDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

VIDEO: काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सणसणीत टोला

Goa Election | तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देता, मग मला का नाही ? उत्पल पर्रिकर यांचा फडणवीसांना सवाल