उत्पल पर्रिकरांसाठी जाहीर उमेदवार मागे घेण्याची शिवसेनेची तयारी, आता फडणवीसांचं सविस्तर उत्तर

गोव्यात 34 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यानंतर आमदारांनी बंड केल्याचं चित्र निर्माण झाल्याचं होतं.

उत्पल पर्रिकरांसाठी जाहीर उमेदवार मागे घेण्याची शिवसेनेची तयारी, आता फडणवीसांचं सविस्तर उत्तर
गोव्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 3:51 PM

गोवा – निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकारण नवंनवीन गोष्टी घडत असल्याचे आपण पाहतोय. तसेच सद्या गोव्यात (GOA) भाजपची (BJP) सत्ता असून ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातचं भाजपने पहिली यादी (FIRST LIST) जाहीर केल्यानंतर अनेकांनी बंड केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अनेक नेत्यांना केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी समजावलं आहे, त्यामुळे कोणीही विरोधात जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी टिव्ही 9 शी बोलताना सांगितलं.

गोव्यात 34 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यानंतर आमदारांनी बंड केल्याचं चित्र निर्माण झाल्याचं होतं. तसंच पणजीतून उत्पल पर्रीकर यांना तिकीट दिली नसल्याने ते नाराज आहेत. ते पणजीतून निवडणुक लढणार असल्याची चर्चा गोव्यात आहे. ते स्वातंत्र्य लढत आहे की, एखाद्या पक्षामधून की हे अजून तरी अंधातरी आहे.

भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना दोन ठिकाणी उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी एका ठिकाणी उमेदवारी नाकारली असून ते पणजी मतदार संघावर ठाम असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरं ठिकाणं जे आहे ते पारंपारिक आहे, तिथं भाजपचा उमेदवार कायम विजयी झाला आहे. त्याचा विचार उत्पल पर्रीकर यांनी करावा

मनोहर पर्रीकर हे भाजपचं नेतृत्व होतं, तसंच ते आमचं कुटुंब आहे, त्यामुळे त्यांनी कुठेही जाण्याची गरज नाही. ते कुठे जातील असं मला वाटतं नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढच्या निवडणुकीच्यावेळी त्यांना ते म्हणतील तिथं आमच्याकडून संधी देण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांनी उत्पल पर्रीकर यांना दिलं आहे. शिवसेनेचे नेते फक्त इथं राजकारण करायला आले आहेत. त्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही.

उत्पल पर्रीकर हे जर स्वतंत्र लढणार असतील, तर शिवसेनेचा त्या ठिकाणची उमेदवारी आम्ही मागे घेऊ असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

कोण आहेत शैलेंद्र वेलिंगकर ज्यांच्या जीवावर शिवसेना गोव्याच्या आखाड्यात उतरलीय?

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? प्रियंका गांधी म्हणाल्या, सगळीकडे मीच तर दिसतेय !

UP Assembly Election 2022: काँग्रेसचा युथ मॅनिफेस्टो, 20 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?