2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये, पाहण्यासाठी उडाली झुंबड

1 तास 57 मिनिटांचा 2026 चा सर्वाच मोठा फ्लॉप चित्रपट, Netflix वर येताच आला ट्रेंडिगमध्ये. IMDb वर या चित्रपटाला आहे 7 रेटिंग. पाहण्यासाठी उडाली झुंबड.

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये, पाहण्यासाठी उडाली झुंबड
| Updated on: Jul 10, 2026 | 5:24 PM

आजच्या काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करणे निर्मात्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा, विनोद, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनांवर आधारित चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. मात्र केवळ मोठे कलाकार असूनही दमदार कथा नसेल तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्याची शक्यता वाढते. 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पति पत्नी और वो 2’ या चित्रपटासोबतही असेच चित्र पाहायला मिळाले.

दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचा हा सिक्वेल मानला जातो. चित्रपटात आयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी, रकुल प्रीत सिंह, विजय राज, तिग्मांशू धुलिया आणि आयशा रझा मिश्रा यांसारख्या दमदार कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाची कथा प्रेम, लग्न आणि वैवाहिक आयुष्यात निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांभोवती फिरते. लग्नानंतरचे मतभेद, गैरसमज आणि विवाहबाह्य संबंधांसारख्या गंभीर विषयांना हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निर्मात्यांनी रोमान्स आणि कॉमेडीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक प्रेक्षकांना कथा फारशी नवी किंवा प्रभावी वाटली नाही. परिणामी चित्रपटाला थिएटरमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

OTT प्लॅटफॉर्मवर चमकले नशीब

चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे झाल्यास, ‘पति पत्नी और वो 2’ साठी सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांचे बजेट खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र भारतात चित्रपटाने जवळपास 60 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन, तर जगभरात सुमारे 68 कोटी रुपयांची कमाई केली. एवढ्या मोठ्या बजेटच्या तुलनेत हा व्यवसाय अपुरा मानला गेला आणि अनेक ट्रेड तज्ज्ञांनी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फ्लॉप किंवा सरासरी श्रेणीत स्थान दिले.

मात्र थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेल्या या चित्रपटाचे नशीब OTT प्लॅटफॉर्मवर पालटले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असून, सध्या तो Netflix India च्या टॉप-10 यादीत आठव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. विविध रेटिंग प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी डिजिटल माध्यमावर त्याचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

Follow Us