AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ

मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ

| Updated on: Aug 26, 2026 | 11:00 AM
Share

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली. मोदी थकले असून त्यांची प्रकृती बरी नाही, तर अमित शहांची प्रतिमा डागाळली असल्याचे ते म्हणाले. राऊत यांनी मंत्रिमंडळातील अकार्यक्षम मंत्र्यांवरही भाष्य करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असल्याचा दावा केला. राहुल गांधींचे नेतृत्व मोदींपेक्षा प्रभावी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर कठोर शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या अपयशाची लक्तरं आंतरराष्ट्रीय स्तरावर टाकल्यामुळे मोदींना मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करावे लागतील, असे राऊत यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींच्या प्रकृतीबद्दल बोलताना राऊत यांनी गंभीर आरोप केले. मोदींची प्रकृती बरी नाही. त्यामुळे मोदींना फार काम झेपत नाही, असे ते म्हणाले. पंडित जवाहरलाल नेहरू जसे शेवटच्या काळात थकले होते, तसेच आता मोदीही थकले आहेत. इतक्या थकलेल्या माणसाने देशाचे नेतृत्व करणे राष्ट्रहिताचे नाही. राष्ट्र प्रथम असेल, तर मोदी आणि शहांनी सत्तेपासून दूर जाऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे, असे राऊत यांनी सुचवले. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर खिल्ली उडवली जात असून, आत्मविश्वास गमावला असल्याचे लक्षण दिसत आहे. त्यांना झोप न येणे हे गंभीर आजाराचे किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

Published on: Aug 26, 2026 11:00 AM

Follow Us