AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली

सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली

| Updated on: Aug 26, 2026 | 9:49 AM
Share

आठवड्याभरात कांदा आणि लसणाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कांद्याचे दर 21-25 रुपयांवरून 45-50 रुपये प्रति किलो झाले आहेत, तर लसणाचे दर 180 ते 200 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लसणाच्या दरात एका आठवड्यात तब्बल 80 ते 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

गेल्या आठवड्याभरात कांदा आणि लसणाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाल्याचे चित्र आहे, तर लसूण 200 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी 21 ते 25 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कांदा आता 45 ते 50 रुपये प्रति किलोने मिळत आहे. यामुळे कांद्याच्या दरांमध्ये एका आठवड्यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, लसणाचे दरही गगनाला भिडले आहेत. सध्या लसूण 180 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

आठवड्याभरापूर्वीच्या दरांच्या तुलनेत लसणाच्या दरांमध्ये तब्बल 80 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ गृहिणींसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या अचानक दरवाढीमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

Published on: Aug 26, 2026 09:48 AM

Follow Us