Plastic Surgery: प्लास्टिक सर्जरी जिवावर बेतली; 21 वर्षीय अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू

अभिनेत्रीने या सर्जरीबाबत तिच्या कुटुंबीयांना कोणतीच माहिती दिली नव्हती. आई-वडिलांना न सांगता मित्रांसोबत ती प्लास्टिक सर्जरी करायला गेली होती. चेतनाच्या (Chetana Raj) मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी रुग्णालयावर निष्काळीपणाचा आरोप केला आहे.

Plastic Surgery: प्लास्टिक सर्जरी जिवावर बेतली; 21 वर्षीय अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू
Chethana Raj
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 2:28 PM

वजन कमी करण्यासाठी केलेली प्लास्टिक सर्जरी ही कन्नड अभिनेत्रीच्या (Kannada Actress) जिवावर बेतली. 21 वर्षीय चेतना राज (Chethana Raj) हिचं खासगी रुग्णालयातचं निधन झालं. प्लास्टिक सर्जरीदरम्यान (Plastic Surgery) झालेल्या चुकीमुळे चेतनाने जीव गमावल्याचं म्हटलं जातंय. सोमवारी चेतनाला ‘फॅट फ्री’ सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सर्जरीनंतर अचानक तिची तब्येत बिघडली. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा झाल्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्जरीनंतर चेतनाच्या फुफ्फुसांमध्ये फ्लुइड्स जमा होऊ लागले आणि त्यानंतर तिचं निधन झालं. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह दुसऱ्या रुग्णालयात नेलं गेलंय. तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आई-वडिलांना दिली नव्हती कल्पना

अभिनेत्रीने या सर्जरीबाबत तिच्या कुटुंबीयांना कोणतीच माहिती दिली नव्हती. आई-वडिलांना न सांगता मित्रांसोबत ती प्लास्टिक सर्जरी करायला गेली होती. चेतनाच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी रुग्णालयावर निष्काळीपणाचा आरोप केला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चेतनाने जीव गमावला, असं त्यांनी म्हटलंय.

चेतना ही कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. ‘गीता’, ‘दोरसानी’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली. सुंदर दिसण्यासाठी, बारीक होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेताना दिसतात. मात्र अनेकदा ही सर्जरी फसल्याचीही उदाहरणं आहेत.