
मुंबई : झगमगत्या विश्वात कायम चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अभिनेत्री नोरा फतेहीसोबत पार्टी करताना स्पॉट करण्यात आलं. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नोरा आर्यनला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पण आता आर्यनला एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. नव्या वर्षाचं स्वागत दोघांनी एकत्र केल्याचं देखील सांगितलं जात आहे. सध्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आर्यन खानसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव सादिया खान असं आहे. सांगायचं झालं तर, आर्यन खान बहिण सुहाना खानसोबत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी दुबईला पोहोचला होता. तेव्हा पार्टीमध्ये त्यांच्यासोबत नोरा दिसल्यामुळे डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला.
नोरासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर आर्यन पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबत दिसला. त्यामुळे आर्यन आणि सादिया एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. खुद्द सादियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर आर्यनसोबत एक फोटो शेअर केला आहे. सध्या सर्वत्र आर्यन आणि सादियाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
रंगलेल्या डेटिंगच्या चर्चांनंतर आर्यन खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ड्रग्स प्रकरणातून दिलासा मिळाल्यानंतर आर्यनने त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. नुकताच आर्यनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये आर्यनने स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. आर्यन आता शुटिंगच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान आर्यन खानच्या अफेअरच्या चर्चा सुरु असताना, सुहाना खानच्या प्रेम प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुखची लेक सुहाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर घरला आहे. एवढंच नाही, तर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.
मीडियारिपार्टनुसार, आगस्त्य नंदाने सुहानासोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सुहाना आणि अगस्त्य ख्रिसमस पार्टीसाठी एकत्र दिसले होते. तेव्हा सुहाना अगस्त्यच्या कुटुंबाला भेटली होती. तेव्हा अगस्त्यने सुहानाची ओळख ‘ती माझी पार्टनर आहे..’ अशी करून दिली. अगस्त्यच्या वक्तव्यानंतर सुहानाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.